डाकीण म्हटल्याने धडगाव तालुक्यातील सोन येथे महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 09:08 PM2019-03-27T21:08:06+5:302019-03-27T21:08:28+5:30

तपास सुरु : चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

Suicide in Son, Dhadgaon | डाकीण म्हटल्याने धडगाव तालुक्यातील सोन येथे महिलेची आत्महत्या

डाकीण म्हटल्याने धडगाव तालुक्यातील सोन येथे महिलेची आत्महत्या

Next

नंदुरबार : गावातील महिलेस डाकीण म्हटल्याचा संशय घेत चौघांनी महिला आणि तिच्या पतीस शिवीगाळ केली होती़ यातून मनस्ताप झाल्याने महिलेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी सोन खुर्द ता़ धडगाव येथे घडली़ याप्रकरणी चौघांविरोधात महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सोन खुर्द येथील जोमीबाई जामसिंग पावरा (४५) यांनी रोनीबाई दोडक्या पावरा यांनी डाकीण संबोधून गावात तशी बदनामी केल्याच्या संशय चंदू वाढऱ्या पावरा, लाला दिल्या पावरा, मांगल्या दिल्या पावरा आणि संजय दोढक्या पावरा यांना होता़ यातून त्यांनी जोमीबाई व त्यांचे पती जामसिंग यांना घरी जाऊन शिवीगाळ केली होती़ वारंवार त्यांच्याकडून हा त्रास होत असल्याने रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ या दरम्यान जोमीबाई यांनी सोन खुर्द येथील घरी गळफास घेत आत्महत्या केली होती़ घटनेनंतर मयत जोमीबाई यांचे पती जामसिंग यांनी सोमवारी धडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत चौघांच्या त्रासामुळे पत्नीने आत्त्महत्या केल्याचे म्हटले होते़ त्यानुसार चंदू पावरा, लाला पावरा, मांगल्या पावरा व संजय पावरा या चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक दहिफळे करत आहेत़ दरम्यान या घटनेमुळे धडगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़
मयत जोमीबाई यांचे पती जामसिंग हे धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत़ त्यांना दोन मुले आहेत़ संबधितांकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याने जोमीबाई कायम चिंतेत रहात होत्या़ यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलीसांचा अंदाज आहे़

Web Title: Suicide in Son, Dhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.