शहाद्यातून लोखंडी ऐंगलसह ट्रक लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:38 AM2018-10-22T11:38:05+5:302018-10-22T11:38:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा येथील टाऊन हॉल समोरून उभा असलेला ट्रक व त्यातील लोखंडी ऐंगल असा एकुण ...

From the shadows to the iron carts, truck lumpas | शहाद्यातून लोखंडी ऐंगलसह ट्रक लंपास

शहाद्यातून लोखंडी ऐंगलसह ट्रक लंपास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा येथील टाऊन हॉल समोरून उभा असलेला ट्रक व त्यातील लोखंडी ऐंगल असा एकुण दोन लाख 10 हजारांचा ऐवज चोरटय़ांनी चोरून नेल्याची घटना घडली. शहरात आधीच भुरटय़ा चो:यांचे सत्र सुरू असतांना आता मोठय़ा वाहनांवरच डल्ला मारला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील जुना प्रकाशा रस्त्यावरील टाऊन हॉलसमोर अख्तर शेख सत्तार बागवान यांनी त्यांची ट्रक (क्रमांक एमएच 17 टी 9381) उभी केली होती. 19 रोजी रात्री चोरटय़ांनी ट्रकच लांबविला. ट्रकमध्ये 160 नग लोखंडी ऐंगल होते. ते देखील चोरटय़ांनी चोरून नेले. दीड    लाखांचा ट्रक व 60 हजारांचे लोखंडी ऐंगल असा एकुण दोन लाख दहा हजारांचा ऐवज चोरटय़ांनी  लांबविला. 
20 रोजी सकाळी ट्रक जागेवर नसल्यामुळे बागवान यांनी ठिकठिकाणी शोध घेतला. परंतु ते मिळून न आल्याने त्यांनी शहादा पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यावरून शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार शेख करीत आहे. 
दरम्यान, शहादा व परिसरात दुचाकी आणि तीन चाकी वाहने चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आता मोठय़ा आणि जड वाहनांवर डल्ला मारला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. चोरटय़ांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
दुचाकी चोरटय़ांची टोळी जेरबंद केल्यानंतर लागलीच दुसरी टोळी सक्रीय होत आहे. त्यामुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढत आहे.    

Web Title: From the shadows to the iron carts, truck lumpas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.