कृषी तंत्रज्ञान महोत्सवास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 03:17 PM2019-01-16T15:17:17+5:302019-01-16T15:17:22+5:30

कृषी विज्ञान केंद्र : शेतक:यांनी अवगत केली आधुनिक माहिती, कृषीतज्ज्ञांकडून मार्गदर्शन

Responses to the Agriculture Technology Festival | कृषी तंत्रज्ञान महोत्सवास प्रतिसाद

कृषी तंत्रज्ञान महोत्सवास प्रतिसाद

Next

नंदुरबार : डॉ.हेडगेवार सेवा समितीच्या नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रात सुरु झालेल्या 13 व्या कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ.हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील होते. 
या वेळी कृषी विकास अधिकारी लाटे म्हणाले की, नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने सुरु केलेली ‘कृषी तंत्रज्ञान महोत्सवाची’ संकल्पना आता संपूर्ण देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये राबवली जात आहे. ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. कृष्णदास पाटील यांनी जमिनीची उत्पादकता वाढविणे आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
आधुनिक डॉ.हेडगेवार सेवा समितीच्या नंदुरबार येथील तंत्रज्ञानाच्या प्रचार-प्रसारासाठी विविध पर्याय असून डॉ.हेडगेवार सेवा समितीच्या नंदुरबार येथील तंत्रज्ञान महोत्सवाची उपयुक्तता जास्त आहे. यात शेतकरी, युवक, शेतकरी महिला तसेच बचतगट या सर्व घटकांसाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान जवळून पाहण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. सध्याच्या काळात शेतीची कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे असल्याने शेतक:यांचा कल यांत्रिकीकरणाकडे वाढतो आहे. हे लक्षात घेवून नंदुरबार जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या पीक अवशेषांच्या व्यवस्थापनासाठीच्या यंत्राची उपयुक्तता विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी मांडली. ट्रॅक्टरचलित यंत्रांचे उच्च दर्जाचे उत्पादन करणा:या शक्तीमान कंपनीचे उपव्यवस्थापक पराग बडगुजर यांनी कापसाच्या प:हाटीचे तुकडे करणारे कॉटन स्टॉक श्रेडर उसाच्या पाचटाचे तुकडे करून पसरविणारे यंत्र, रोटाव्हेटर आणि नांगर यांचे एकत्रितपणे कार्य करणारे पॉवरहॅरो, ट्रॅक्टरचलित फवारणीयंत्र, खड्डे खोदण्यासाठी उपयुक्त पोस्टहोल डिगर या यंत्राची तांत्रिक माहिती आणि वापरण्याची पद्धत याविषयी माहिती दिली. कंपनीचे विभागीय विपणन अधिकारी प्रशांत केवट यांनी यंत्रासाठी शासनाच्या योजनांविषयी शेतक-यांना माहिती दिली. जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील सेंद्रीय पदार्थ, सेंद्रीयकर्ब यांचे महत्त्व कृषी विज्ञान केंद्राचे  विषय विशेषज्ञ आर.एम. पाटील यांनी विषद केले. सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी पिकांच्या वाया जाणारे अवशेष पुन्हा जमिनीत टाकणे गरजेचे असल्याचे सांगून त्यासाठीच्या गांडूळखत, सेंद्रीयखत आदी पद्धतीची माहिती दिली.  सूत्रसंचालन जयंत उत्तरवार यांनी केले. कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे आर.एम. पाटील, पी.सी. कुंदे, यु.डी. पाटील, डॉ.महेश गणापुरे, आर.आर. भावसार, व्ही.एस. बागल, गीता कदम, विजय बागल, राहुल नवले, रजेसिंग राजपूत, किरण मराठे, कल्याण पाटील, कैलास सोनवणे यांनी सहकार्य केले.

Web Title: Responses to the Agriculture Technology Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.