शहाद्यात तेली पंच समाज मंडळातर्फे निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:17 PM2018-02-22T13:17:42+5:302018-02-22T13:17:48+5:30

The Prohibition Morcha by Tehali Panch Samaj Mandal in Shahadat | शहाद्यात तेली पंच समाज मंडळातर्फे निषेध मोर्चा

शहाद्यात तेली पंच समाज मंडळातर्फे निषेध मोर्चा

Next

ऑनलाईन लोकमत
शहादा, दि़ 22 : महादेवपुरा दोंडाईचा येथील सहा वर्षीय बलिकेवर अमानुष अत्याचार करुन तिच्या आई-वडिलांना जीवेठार मारण्याची धमकी देणा:यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी शहादा येथे समस्त हिंदू तेली पंच समाज मंडळातर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला.
दोंडाईचा येथील महादेवपुरा परिसरातील 6 वर्षीय बलिकेवर अमानुषपणे लैंगिक अत्याचार करणा:या नराधामांवर व बलिकेच्या आई-वडिलांना जीवेठार मारण्याची धमकी देणा:यांवर कठोर कारवाई करावी व बलिकेस न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारी शहादा येथे तैलिक मंगल कार्यालयापासून मुख्य रस्त्यावरुन शहादा पोलीस ठाण्यावर समस्त हिंदू तेली पंच मंडळ शहादा तालुक्यातर्फे भव्य निषेध मोर्चा काढुन पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात अध्यक्ष अरुण चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, डॉ.योगेश चौधरी, भरत चौधरी, संजय चौधरी, सुभाष चौधरी, गिरधर चौधरी, यशवंत चौधरी, विनोद चौधरी, हिरालाल चौधरी, पुरूषोत्तम चौधरी, रमण चौधरी, दिलीप चौधरी, प्रा. सदाशिव चौधरी, दशरथ चौधरी, देविदास चौधरी, प्रविण चौधरी यांच्यासह तेली समाजाचे युवक व नागरिक उपस्थित होते. शहादा तेली समाजाच्या वतीने पीडित कुटुंबाला 31 हजार रुपयांची रोख मदत देण्यात आली.
 

Web Title: The Prohibition Morcha by Tehali Panch Samaj Mandal in Shahadat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.