शहादा शहरातील अतिक्रमण काढलेल्या जागेवर प्रवासी वाहनांचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:00 PM2017-11-17T13:00:28+5:302017-11-17T13:00:38+5:30

अतिक्रमणधारकांचा संताप, वाहतुकीला पुन्हा अडथळा

Overseas vehicles occupy encroachment in Shahada city | शहादा शहरातील अतिक्रमण काढलेल्या जागेवर प्रवासी वाहनांचा ताबा

शहादा शहरातील अतिक्रमण काढलेल्या जागेवर प्रवासी वाहनांचा ताबा

Next
कमत न्यूज नेटवर्कशहादा शहरातील बसस्थानकालगत डोंगरगाव रोड, दोंडाईचा रोड परिसरातील वाहतुकीला अडथळा ठरणा:या टप:यांसह पक्के व इतर 255 अतिक्रमण पालिकेतर्फे काही दिवसांपूर्वी काढण्यात आले. मात्र त्याठिकाणी आता अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणा:या वाहनांनी ताबा घेतल्याने त्याठिकाणी आता वाहतुकीला पुन्हा अडथळा निर्माण होत आहे.पालिकेतर्फे मागील महिन्यात बसस्थानकालगत डोंगरगाव रोड व दोंडाईचा रोड आदी परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणा:या अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे या परिसरातील अतिक्रमणधारकांनी कारवाई होण्याआधीच स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. अतिक्रमण काढल्यामुळे डोंगरगाव रस्ता व बसस्थानक चौकाने मोकळा श्वास घेतला होता. मात्र या जागेवर सध्या अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणा:या वाहनांनी अतिक्रमण करीत वाहनांच्या रांगा लागत आहेत. या रस्त्यावर ही वाहने उभी राहत असल्याने ब:याचवेळा वाहतुकीची कोंडी होते. बसस्थानक ते पटेल रेसिडेन्सी चौकार्पयत रस्त्याच्या दुतर्फा ही वाहने लावलेली असतात. हा रस्ता नवीन वसाहतींना जोडणारा मुख्य रस्ता असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ असते. आधीच अरुंद व त्यातच रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी राहत असल्याने ब:याचदा अपघात होतात. या अवैध प्रवासी वाहतूक करणा:या वाहनधारकांमध्ये खाकीचा धाकच नसल्याचे जाणवते. वाटेल त्याठिकाणी रस्त्यावर वाहने उभी केली जातात. काही वाहतूक पोलीस तर अटकाव करण्याचे सोडून त्या वाहन चालकांजवळ गप्पा करत उभे असतात. काही दिवसांपूर्वी शहराच्या वाहतुकीच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक नियुक्त करून वाहतूक विभाग कार्यान्वित करण्यात आला. मात्र हा विभाग थोडय़ाच दिवसात बंद पडल्याचे समजते. अतिक्रमण काढून मोकळ्या झालेल्या जागेवर पालिकेने योग्य त्या उपाययोजना करून वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने हटविण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Overseas vehicles occupy encroachment in Shahada city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.