आता ‘शाळा सिद्धी’ प्रकल्प

By admin | Published: January 16, 2017 12:24 AM2017-01-16T00:24:52+5:302017-01-16T00:24:52+5:30

शाळा मूल्यमापन : जिल्ह्यातील 318 शाळांची ऑनलाइन नोंदणी

Now the 'School Siddhi' project | आता ‘शाळा सिद्धी’ प्रकल्प

आता ‘शाळा सिद्धी’ प्रकल्प

Next

गुणवत्तापूर्ण शाळेसह त्यात राबविण्यात येणा:या विविध उपक्रमांचे मूल्यमापन करता यावे यासाठी जिल्हा परिषद शाळांसाठी ‘शाळा सिद्धी-2016’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी 318 शाळांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. आयएसओच्या धर्तीवर राबविण्यात येणा:या या उपक्रमासाठी शाळांमध्ये स्पर्धा लागली आहे.
प्रत्येक शाळेस आपल्या क्षमतेने सवरेत्कृष्ट परिणाम मिळविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी आता जिल्हा परिषद    शाळांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यासाठी आयएसओच्या  धर्तीवर ‘शाळा सिद्धी’ हा राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येणार आहे. परिणामी शाळास्तरावर शिक्षणाची मानके सुधारण्यास मदत होणार    आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा आयएसओ प्रमाणपत्राच्या तोडीच्या असल्या तरी योग्य मार्गदर्शनाच्या आणि मानसिकतेच्या अभावामुळे अशा शाळा आयएसओ प्रमाणपत्रासाठी नोंदणी करीत नाहीत. त्यामुळेच आता राष्ट्रीय पातळीवर सुरू करण्यात आलेल्या शाळा सिद्धी प्रकल्पाची अंमलबजावणी नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शाळांमध्येदेखील करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात त्यासाठी 318 जिल्हा परिषद शाळांनी नोंदणी केली असून ऑनलाइन रजिस्ट्रेशनदेखील केले आहे.
काय आहे शाळा सिद्धी?
शाळा सिद्धी प्रकल्पामध्ये शाळेने राबविलेले सर्व प्रकारचे उपक्रम नियमित सुरू राहावे. त्यातील सातत्यता, सवरेत्कृष्ट परिणाम आणि शिक्षणाची मानके सुधारणे हा उद्देश आहे. अर्थात विद्याथ्र्याना मिळणा:या भौतिक सुविधा, गुणवत्तेच्या सुविधा, सोयी, उपस्थिती टिकावी यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, डिजिटल शाळा, ई-लर्निग उपक्रम, हसत-खेळत शिक्षण यांचा समावेश आहे.
यापूर्वीचे मूल्यमापन
सध्या राबविण्यात येणारा उपक्रम हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे. त्यामुळे यापूर्वी राबविण्यात येणारे उपक्रम अर्थातच या नवीन प्रणालीत   समाविष्ट होणार आहेत. 
मूल्यमापनासाठी समिती
शाळा सिद्धी 2016 या प्रकल्पात सहभागी होणा:या शाळांच्या मूल्यमापनासाठी समिती नेमण्यात येणार आहे. तिचे स्वरूप अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. अर्थात राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरून तिचे संचलन होणार आहे.

पहिल्या टप्प्यात मोजक्याच शाळा
नंदुरबार जिल्ह्यात सुरुवातीला या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 318 शाळांना पुढाकार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातून किमान 50 शाळा अशा एकूण 318 शाळांनी ‘शाळा सिद्धी-2016’ अर्थात ‘एसएस-2016’ साठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे. या उपक्रमात अध्ययन निष्पत्तीसोबतच प्रक्रियेचादेखील पाठपुरावा केला जात आहे. प्रत्येक शाळेस आपल्या क्षमतेने सवरेत्कृष्ट परिणाम मिळविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल हा त्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हा परिषद प्राथमिक विभागाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Now the 'School Siddhi' project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.