नाथाभाऊ भाजपातच राहणार : एकनाथराव खडसे

By Admin | Published: March 27, 2017 04:53 PM2017-03-27T16:53:58+5:302017-03-27T16:53:58+5:30

नाथाभाऊ भाजपातच राहणार असून राष्ट्रवादी प्रवेशाच्या निव्वळ अफवा आहेत अशी माहिती एकनाथराव खडसे यांनी सोमवारी भुसावळ येथे पत्रकारांशी बोलताना दिली़

Nathabhau will remain in BJP: Anandrao Khadse | नाथाभाऊ भाजपातच राहणार : एकनाथराव खडसे

नाथाभाऊ भाजपातच राहणार : एकनाथराव खडसे

googlenewsNext
>भुसावळ, दि.27- नाथाभाऊ भाजपातच राहणार असून राष्ट्रवादी प्रवेशाच्या निव्वळ अफवा आहेत. अशा अफवा पसरविणारे आपल्यावर प्रेम करणारे भाजपाप्रेमी वा अन्य दुसरेही असू शकतात, अशी माहिती एकनाथराव खडसे यांनी सोमवारी भुसावळ येथे पत्रकारांशी बोलताना दिली़
गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, माजी कृषीमंत्री शरद पवार व नवाब मलिक यांच्याशी झालेल्या चर्चेचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी हा खोडसाळपणा असल्याचे सांगत स्व-पक्षातल्या काहींचे आपल्यावर अधिक प्रेम आहे त्यामुळेच हे प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितल़े 
खडसे यांनी भूमिका मांडताना स्पष्ट केले की, आपण भाजपा सोडणार हे कार्यकत्र्यानादेखील पटणारे नाही़ ज्या पक्षाचा विस्तार आपण केला तो पक्ष आपण सोडणार नाही़ जे आज पदावर बसलेले आहेत ते एका दिवसात बसलेले नाही, असे सांगत जिल्ह्याची आधीची खडकाळ जमीन आपण सुपीक केली आहे त्यामुळे तिच्यावर तण तर वाढणारच आह़े, असेही ते म्हणाल़े पक्ष सोडणे हा विचारही आपल्या मनात नाही़ काहींना मात्र अफवा पसरवण्यात आनंद वाटतो़ जुने चार ते पाच वर्षापूर्वीचे फोटो सोशल मिडीयात टाकले जात आहेत़ कुणालातरी मी जास्त आवडायला लागलो आहे हे यातून सिद्ध होत़े अफवा पसरवणारा पक्षातलाच आहे, असेही नाही, असे सांगत त्यांनी सहवासातून कदाचित हे निर्माण झालेले हे प्रेम असावे, अशी कोपरखळी त्यांनी मारली़
राष्ट्रवादीच भाजपा विलीन होणार मात्र हीदेखील अफवा
शरद पवारांना राष्ट्रपती बनवत असल्यास राष्ट्रवादीच भाजपात विलीन करण्याची तयारी आहे, असे सूचक विधान करीत अर्थात ही देखील सोशल मिडीयावर अफवा असल्याची कोपरखळी खडसे यांनी मारली़ तसेच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या विषयावर डुबती नैय्यात बसणार कोण, अशी कोपरखळीही त्यांनी मारली़
 

Web Title: Nathabhau will remain in BJP: Anandrao Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.