नंदुरबारात विरोधाला विरोध न ठेवता सर्वसमावेशक विकास व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:49 AM2017-12-21T11:49:22+5:302017-12-21T11:49:56+5:30

In Nandurbar, there should be comprehensive development without opposing the opposition | नंदुरबारात विरोधाला विरोध न ठेवता सर्वसमावेशक विकास व्हावा

नंदुरबारात विरोधाला विरोध न ठेवता सर्वसमावेशक विकास व्हावा

Next

मनोज शेलार । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :
पालिकेतील एकुण 39 सदस्यांपैकी तब्बल 33 सदस्य हे नव्याने निवडून आलेले आहेत. त्यामुळे नवीन सदस्यांना शहर विकास आणि आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्याचे नव्याने आव्हान राहणार आहे. सुदैवाने नगराध्यक्षपदी दिर्घ अनुभव असलेल्या र}ा रघुवंशी असल्याने शहराचा सर्वागिन विकास होईल आणि विकासाची गती कायम राहील. सत्ताधारी आणि विरोधक हा भेद राहणार नाही, विरोधकांनी देखील केवळ विरोधाला विरोध म्हणून योजना आणि विकास कामांना खिळ बसविणार नाही अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.
पालिकेच्या निवडणुकीचे कवित्त्व आता संपल्यासारखे आहे. परंतु आता येत्या पाच वर्षात शहर विकासाचे व्हिजन कायम ठेवून नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखणे देखील तेवढेच गरजेचे ठरणार आहे. यापूर्वी शहर विकासाची गाडी सुपरफास्ट धावली आहे. निवडणुकांमुळे ती सध्या थांबली असली तरी सत्ताधारींकडेच जनतेने पुन्हा पालिका सोपविली असल्यामुळे ही सुपरफास्ट पुन्हा धावू लागेल यात शंका नाही. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आधीच कामांचे नियोजन करून ठेवले असले तरी नव्याने आलेल्या सदस्यांची मर्जी सांभाळणे आणि त्यांच्या कामांच्या, विकासाच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी देखील प्रय} करावे लागणार आहेत.
पालिकेत निवडून आलेल्या 39 सदस्यांपैकी तब्बल 33 सदस्य हे नव्याने अर्थात पहिल्यांदाच पालिकेचे सदस्य म्हणून येणार आहेत. याआधी नगरसेवक असलेल्या पाच सदस्यांमध्ये माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी उपनगराध्यक्ष परवेजखान, किरण रघुवंशी, दिपक दिघे आणि चारुदत्त कळवणकर यांचा समावेश आहे. नवीन निवडून आलेल्या सदस्यांना पालिकेचे कामकाज, सभागृहाचे कामकाज आणि आपल्या प्रभागातील प्रश्न, समस्या आणि नागरिकांची मागणी यादृष्टीने त्यांना अवगत करून देणे आवश्यक ठरणार आहे. 39 सदस्यांमध्ये महिला सदस्यांची संख्या तब्बल 22 इतकी आहे. त्यातील केवळ एकच महिला माजी नगरसेवकाच्या प}ी आहेत. 
पालिकेत यावेळी विरोधातील 11 नगरसेवक देखील राहणार आहेत. यापूर्वी पालिकेने विकास करतांना सत्ताधारी व विरोधक हा भेद ठेवला नव्हता. सर्वसमावेशक विकास हे ध्येय समोर ठेवले होते. आता देखील तेच ध्येय ठेवणे आवश्यक ठरणार आहे. विरोधकांकडून काही कामांना, योजना, निधी यांना विरोध होऊ शकतो. लोकशाहीत ही बाब सर्वसामान्य समजली जाते. त्यामुळे विरोध केला म्हणून संबधिताच्या प्रभागात काम न करणे ही मानसिकता असू नये विरोधकांनी देखील केवळ विरोधाला विरोध म्हणून कामांमध्ये आडकाठी आणून शहर विकासाच्या योजनांना खिळ घालू नये ही देखील अपेक्षा जनतेची राहणार आहे.
शहराचा विकासाचा वेग पहाता आणि झालेली कामे पहाता शहरवासीयांनी काँग्रेसवर पुन्हा विश्वास व्यक्त करीत त्यांच्याकडे सत्ता सोपविली आहे. त्यामुळे झालेल्या विकास कामांच्या बळावर आणि होऊ घातलेल्या कामांच्या बळावर शहराला राज्यातील पहिल्या दहा विकसीत आणि स्मार्ट शहरांच्या रांगेत आणण्याचे ध्येय काँग्रेसला ठेवावे लागणार आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. शासनाकडून विविध योनजेच्या माध्यमातून निधी खेचून आणण्याची कला आहे. शासनातील मंत्री, अधिकारी यांच्याशी वैयक्तिक संबधाच्या माध्यमातून ते योजना मंजुर करून आणून कामेही करून घेतात. त्यामुळे ‘पहिल्या दहा शहरात’ हे ध्येय पुर्ण करणे फारसे कठीण राहणार नाही. त्यादृष्टीने आतापासूनच नियोजन करून त्यानुसार कामांची आखणी केल्यास ते शक्य होणार आहे.
एकुणच शहरवासीयांनी सलग चौथ्यांदा काँग्रेसवर पर्यायाने आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे शहराचा सर्वागीन विकासाचे ध्येय तर त्यांनी ठेवले आहेच, परंतु विकास कामांची गती कायम राखणे देखील तेवढेचे गरजेचे ठरणार आहे.

Web Title: In Nandurbar, there should be comprehensive development without opposing the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.