नंदुरबार रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:00 PM2019-01-21T13:00:49+5:302019-01-21T13:00:56+5:30

नंदुरबार : ताप्ती सेक्सशनवरील रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर नंदुरबार या मध्यवर्ती स्थानकाला महत्त्व आले आहे. त्यामुळे या स्थानकाचे रूप ...

Nandurbar railway station will change | नंदुरबार रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार

नंदुरबार रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार

Next

नंदुरबार : ताप्ती सेक्सशनवरील रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर नंदुरबार या मध्यवर्ती स्थानकाला महत्त्व आले आहे. त्यामुळे या स्थानकाचे रूप पालटू लागले आहे. विविध कामांना येथे सुरुवात झाली आहे. सुरुवातीला फलाटफार्म नंबर एक वरील कामे पुर्ण करण्यात येणार आहेत. दरम्यान, या कामांसह आता दुस:या पादचारी पुलाबाबत देखील निर्णय घेतला जावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
भुसावळ-सुरत रेल्वे मार्गाचे नुकतेच दुहेरीकरण पुर्ण झाले आहे. यामुळे पश्चिम रेल्वेच्या नंदुरबार स्थानकाला महत्व आले आहे. पश्चिम व मध्य रेल्वेला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून पश्चिम आणि उत्तरसह दक्षिण भारताला जोडणा:या अनेक गाडय़ा या मार्गाने सुरू झाल्या आहेत. परिणामी नंदुरबारातील रेल्वे स्थानकावरील दळणवळण वाढले आहे. ही बाब लक्षात घेता रेल्वे स्थानकातील विविध कामांनाही वेग देण्यात आला आहे.
फलाटफार्मचे काम
स्थानकातील एक नंबरच्या फ्लॅटफार्मचे काम सुरू करण्यात आले आहे. जुन्या स्टाईल काढून टाकल्या जात आहे. त्यावर पिवळे पट्टे  मारण्यात येणार आहेत. जेणेकरून रेल्वे येतांना व जातांना प्रवाशांना त्यापासून सुरक्षीत अंतरावर उभे राहता येईल. शिवाय इतर मोठय़ा स्थानकांप्रमाणे सेन्सर देखील लावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रूळ बदलण्याचेही काम
स्थानकातील फ्लॅटफॉर्म एक वरील रुळ देखील बदलण्यात येत आहेत. जुने रुळ झाल्यामुळे या ठिकाणी स्वच्छतेसाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे या ठिकाणी नव्याने रुळ टाकून स्लिपर टाकतांना त्याखाली सहज स्वच्छता करता येईल अशा पद्धतीने उपाययोजना करण्यात येणार    आहेत. 
यामुळे रेल्वे स्थानकावरील दरुगधीला आळा बसू शकणार असून स्वच्छता देखील काय राहण्यास मदत होणार आहे.
पाईपही बदलणार
रेल्वेत पाणी भरण्यासाठी तसेच स्वच्छतेसाठी येथे असलेली पाईपलाईन आणि नळ देखील बदलण्यात येत आहेत. पाणी वाया जावू नये व कमीत कमी मणुष्यबळाची गरज लागावी यादृष्टीने अत्याधुनिक पद्धतीची पाईपलाईन राहणार आहे. 
रंगरंगोटीलाही सुरुवात
स्थानकाच्या रंगरंगोटीलाही सुरुवात करण्यात आली आहे. तिन्ही फ्लॅटफॉर्म, इमारत, पादचारी पूल यासह प्रतिक्षा गृहाला रंगकाम केले जात आहे. 
तीन महिन्यात ही सर्व कामे पुर्ण करण्याचे आदेश रेल्वेने संबधीत ठेकेदाराला दिले आहेत.
इमारत मात्र जुनीच
रेल्वे मार्ग दुहेरीकरणाअंतर्गत उधना ते धरणगाव दरम्यानचे अनेक रेल्वे स्थानकांच्या इमारतींचे काम नव्याने करण्यात आले आहे.    नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे काम देखील नव्याने करण्याचे प्रस्तावीत होते. 
परंतु ब्रिटीशकालीन ऐतिहिासीक ठेवा असल्यामुळे व सुस्थितीतील इमारत असल्यामुळे काही वर्ष ही इमारत राहू द्यावी अशी मागणी पुढे आली. परिणामी इमारतीचे काम पुर्ण होऊ शकले नाही. 
 

Web Title: Nandurbar railway station will change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.