नंदुरबार पालिका निवडणुक : सत्ताधारी काँग्रेसपुढे भाजपचे कडवे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:24 PM2017-12-05T12:24:50+5:302017-12-05T12:25:14+5:30

Nandurbar municipal elections: BJP's tough challenge against ruling Congress | नंदुरबार पालिका निवडणुक : सत्ताधारी काँग्रेसपुढे भाजपचे कडवे आव्हान

नंदुरबार पालिका निवडणुक : सत्ताधारी काँग्रेसपुढे भाजपचे कडवे आव्हान

Next

रमाकांत पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह नवापूर व तळोदा या तिन्ही पालिकांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचे वर्चस्व असले तरी यावेळी मात्र भाजपने काँग्रेससमोर कडवे आव्हान उभे केले आहे. नगराध्यक्ष निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने यावेळी या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषत: जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या नंदुरबार पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी एक लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याने येथील निवडणूक अधिक प्रतिष्ठेची झाली आहे. 
पालिका निवडणुकीत माघारीनंतर राजकीय चित्र स्पष्ट झाले असून नंदुरबार पालिकेत काँग्रेस आणि भाजप यांच्यातच सरळ लढत रंगणार आहे. या ठिकाणी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु काँग्रेसच्या विद्यमान नगराध्यक्षा र}ा रघुवंशी व भाजपचे डॉ.रवींद्र हिरालाल चौधरी यांच्यात अत्यंत प्रतिष्ठेची व चुरशीची लढत रंगत आहे. काँग्रेसने पुन्हा सत्तेवर येण्यासाठी सर्व जोर लावला आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी हे स्वत: प्रत्येक मतदाराच्या भेटीगाठी घेत असून कॉर्नर सभांवरही भर दिला आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांर्पयत पोहचविण्यासाठी त्यांचे प्रय} आहेत.  गेल्या पाच वर्षाच्या काळात शहर विकासाच्या 200 कोटींपेक्षा अधीक योजना व कामांची जंत्री ते लोकांपुढे मांडत आहेत.
 दुसरीकडे भाजपतर्फे डॉ.रवींद्र चौधरी यांच्या बरोबरच खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार शरिष चौधरी, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी हे प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीसह कॉर्नर सभांवर त्यांचाही भर आहे. डॉ.विजयकुमार गावीत हे आपल्या जाहिर सभांमधून नंदुरबारच्या विकासासाठी आपणही निधी मिळवून देण्यासाठी काय प्रय} केले त्याची माहिती सांगत असून खासदारांच्या माध्यमातून परिसरात व जिल्ह्यात केलेल्या विकास कामांची माहिती देत आहेत. केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने पालिकेचीही सत्ता मिळाल्यास विकासाला गती येईल असे मतदारांना पटवून देण्यासाठी त्यांचा प्रय} आहे. उमेदवार डॉ.रवींद्र चौधरी स्वत: उद्योजक असल्याने शहरातील बेरोजगार युवकांसाठी उद्योगाच्या माध्यमातून रोजगार देण्याचा मुद्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. याशिवाय भाजपतर्फे विविध आरोपांचा पाढा वाचला जात आहे.
भाजप आणि काँग्रेसचा या प्रतिष्ठेच्या लढतीत उर्वरित पाच उमेदवारांची भुमिका महत्त्वाची ठरत आहे. कारण या पाचपैकी दोन उमेदवार अर्थात एमआयएमचे सैय्यद रफअत व राष्ट्रवादीचे शेख आरिफ कमर हे मुस्लिम समाजातील आहेत. विशेष म्हणजे शहरातील एक लाख मतदारांपैकी 25 हजारापेक्षा अधीक मतदार मुस्लिम आहेत. त्यामुळे या उमेदवारांना मिळणा:या मताधिक्यावरही काँग्रेस आणि भाजपच्या विजयाचे समिकरण अवलंबून असल्याने त्याकडेही विशेष लक्ष आहे.
प्रचारात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची प्रचंड यंत्रणा कामाला लागली आहे. रिक्षावरील ध्वनीक्षेपक, एलईडी स्क्रिन, तीनचाकी सायकलच्या माध्यमातून लक्षवेधी प्रचार सुरू आहे. प्रचारातील गितांनी तर अतिरेक केला आहे. त्यामुळे एकुणच नंदुरबार शहरातील वातावरण अक्षरश: ढवळून निघाले आहे.
नवापूर, तळोद्यात तिरंगी
नंदुरबारच्या प्रचाराच्या वातावरणाच्या तुलनेत नवापूर आणि तळोद्यात प्रचार यंत्रणा फारशी सक्रीय नसल्याचे चित्र आहे. या दोन्ही ठिकाणी प्रचार सुरू आहे. प्रचार रॅली किंवा कॉर्नर सभा होत आहेत. पण नंदुरबारच्या तुलनेत कमी आहे.
तळोद्यात काँग्रेसचे भरत माळी, भाजपचे अजय परदेशी व राष्ट्रवादीचे देवेंद्र जोहरी यांच्यात तिरंगी लढत आहे. या ठिकाणी देखील काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसचे उमेदवार भरत माळी हे पूर्वी नगराध्यक्ष होते परंतु त्यांना अपात्र ठरविल्याने अडिच वर्षापासून तेथे त्यांच्याच मर्जीतील काँग्रेसच्याच र}ा चौधरी या नगराध्यक्षपदाचे कामकाज सांभाळत होते. आता ते पुन्हा स्वत: निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी देखील विकासाचा मुद्दा घेवून प्रचार सुरू केला आहे. भाजपचे अजय परदेशी यांनी त्यांना कडवे आव्हान दिले आहे. केंद्रात आणि राज्यातील सत्तेच्या बळावर विकास कामे करण्याचे ते आश्वासन देत आहे. राष्ट्रवादीने देखील येथे उमेदवार दिला असून या ठिकाणी या पक्षाचेही प्राबल्य असल्याने तिरंगी लढत होत आहे.
नवापूर मध्ये देखील काँग्रेसतर्फे हेमलता अजय परदेशी, राष्ट्रवादीतर्फे अर्चना नगराळे तर भाजपतर्फे ज्योती जयस्वाल हे रिंगणात आहेत. येथे एकुण सहा उमेदवार रिंगणात असले तरी प्रत्यक्ष लढत तिघांमध्येच आहे. काँग्रेसच्या प्रचाराची धुरा युवानेते शिरिष नाईक व भरत गावीत यांनी स्विकारली असून केलेल्या विकास कामांच्या बळावर ते ही निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी मागील थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कै.गोविंदराव वसावे हे विजयी झाले होते. त्यांच्यानंतर गेल्या दोन, तीन वर्षापासून नरेंद्र नगराळे यांनी धूरा स्विकारीत पालिकेत विरोधी पक्षनेत्याच्या माध्यमातून चांगला जम बसविला होता. त्यांच्याच प}ी अर्चना वळवी-नगराळे या निवडणूक लढवीत असल्याने त्या निवडणुकीच्या स्पर्धेत आल्या आहेत. त्यांच्या प्रचाराची धूरा माजी आमदार शरद गावीत यांनी स्विकारली आहे. 
भाजपचा या ठिकाणी मागील काळात पालिकेत फारसा प्रभाव नसला तरी केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर भाजप कार्यकत्र्यामध्ये येथे उत्साह आला आहे. शिवाय खासदार डॉ.हिना गावीत या स्वत: येथे प्रचाराची धूरा सांभाळत असल्याने भाजपचे उमेदवारही येथे स्पर्धेत आहे. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत रंगत आहे.
एकुणच निवडणुकीला अद्याप आठ दिवस बाकी असल्याने या आठ दिवसाच्या प्रचारात आपल्या भुमिका प्रभावीपणे मतदारांर्पयत कोण पोहचविणार त्यावर तिन्ही ठिकाणच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.
 

Web Title: Nandurbar municipal elections: BJP's tough challenge against ruling Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.