सुलवाडे येथील उसाच्या शेतात आढळली जळालेली मोटारसायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:23 PM2017-11-19T12:23:45+5:302017-11-19T12:23:53+5:30

10 दिवसांपासून शेतात पडून : सुलवाडे शिवारात ऊसतोड सुरू असताना निदर्शनास आल्याने खळबळ

Motorcycles found in the sugarcane field in Sulawade | सुलवाडे येथील उसाच्या शेतात आढळली जळालेली मोटारसायकल

सुलवाडे येथील उसाच्या शेतात आढळली जळालेली मोटारसायकल

Next
कमत न्यूज नेटवर्कम्हसावद : सुलवाडे, ता.शहादा येथील शेतक:याच्या शेतात ऊस तोड सुरू असताना चोरीची मोटारसायकल आढळून आली असून, चोरी लपविण्यासाठी चोरांनीच दोनदा ऊस जाळून टाकला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. चोर स्थानिकच असल्याचा कयास आहे.याबाबत वृत्त असे की, सुलवाडे येथील शेतकरी सोनसिंग बन्सी चौधरी यांचे टवळाई रस्त्यावर सुलवाडे शिवारातील शेत भाडेबटाईने अंबालाल मदन पाटील हे करतात. पाच दिवसांपूर्वी सातपुडा कारखान्यामार्फत चार एकर नोंद असलेल्या उसाची तोड सुरू झाली. दुस:या दिवशी रात्री उसाला आग लागल्याची माहिती मिळताच गावातील लोकांनी धावपळ करून आग विझविली. सकाळी उसात जळालेली मोटारसायकल आढळून आली. गाडीची दोन्ही चाके नव्हती तर शॉकअप 30 फूट अंतरावर पडलेले होते. नंबरप्लेट अर्धवट जळालेली होती. शेताच्या बांधापासून 25 फूट अंतरावर उभ्या उसातून मोटारसायकल कशी नेली हे विशेष. संबंधित शेतक:याने म्हसावद पोलिसांना तत्काळ कळविले. पोलिसांनी नंतर पाहणीच केली नाही. चार एकर संपूर्ण उसाची तोड झाली. शेतक:याला शेतीची मशागत करून दुसरे पीक पेरणी करावयाचे असली तरी 10 दिवसांपासून मोटारसायकल तेथेच पडली आहे. म्हसावद पोलीस सुस्त आणि मस्त झाले आहे.

Web Title: Motorcycles found in the sugarcane field in Sulawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.