किमान तापमान दहा अंशार्पयत घसरणार : नंदुरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:44 PM2018-12-15T12:44:39+5:302018-12-15T12:44:43+5:30

थंडीची लाट वाढणार : शितलहरींच्या प्रभावामुळे दिवसाही भरली हुडहुडी

The minimum temperature will fall to ten degrees: Nandurbar | किमान तापमान दहा अंशार्पयत घसरणार : नंदुरबार

किमान तापमान दहा अंशार्पयत घसरणार : नंदुरबार

Next

नंदुरबार : उत्तरेकडून येत असलेल्या शितलहरींचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आह़े याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील किमान तापमानात वेगाने घट होऊन ते पुढील आठवडय़ात 10 अंशाच्याही खाली जाण्याची शक्यता ‘आयएमडी’तर्फे व्यक्त करण्यात आली आह़े 
जिल्ह्यात दिवसेंदिवस किमान तापमानात वेगाने घट होत आह़े उत्तरेकडील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या शितलहरींचा प्रभाव वाढत आह़े त्यामुळे परिणामी नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रातसुध्दा थंडीचा जोर वाढताना दिसून येत आह़े शुक्रवारी नंदुरबारचे किमान तापमान 12.4 अंश सेल्शिअस इतके नोंदवले गेले आह़े तर कमाल तापमान 28 अंशावर होत़े दिवसागणिक दिवसाच्या तापमानातसुध्दा वेगाने घट होताना दिसून येत आह़े बुधवारी ब:याच दिवसांच्या कालावधीनंतर दिवसाच्या तापमानात घट होऊन ते 30 अंशाच्या खाली उतरले होत़े शुक्रवारी कमाल तापमान 28 अंशावर जाऊन पोहचले होत़े त्यामुळे दिवसेंदिवस किमान व कमाल तापमानात होणारी घट लक्षात घेता येत्या काळात सातपुडा परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात थंडीची लाट पसरण्याचा अंदाज आह़े
दिवसाही भरली हुडहुडी
शुक्रवारी किमान तापमान 12.4 अंश सेल्शिअस इतके नोंदवले गेले होत़े दिवसेंदिवस तापमानात घट होताना दिसत आह़े सकाळपासूनच अंगावर काटा आणणारी थंडी जाणवत होती़ परंतु ऐरवी जास्तीत जास्त सकाळी 10 वाजेर्पयत असलेला थंडीचा जोर शुक्रवारी मात्र दिवसभर कायम होता़ दुपारीदेखील मोठय़ा प्रमाणात थंड वा:यांच्या प्रभावामुळे गारवा जाणवत होता़ संपूर्ण दिवस थंडीचा जोर कायम असल्याने अनेक  नागरिकांनी संपूर्ण दिवस अंगात उबदार कपडे घालणे पसंत केल्याचेही दिसून आल़े  पहाटे व सकाळी मोठय़ा प्रमाणात थंडी जाणवत आह़े त्यामुळे याचा परिणाम काही प्रमाणात जनजीवनावरही होताना दिसून येत आह़े
शितलहरींचा प्रभाव 
हिमालयाच्या पायथ्याशी शितलहरींचा प्रभाव वाढला आह़े त्याच प्रमाणे अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले असल्याने बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आह़े उत्तरेकडून दक्षिणेकडे येणा:या शितलहरींच्या मार्गात कुठलाही अडथळा नसल्याने ताशी 80 ते 90 किमी वेगाने ते पुढे सरसावत आहेत़ उत्तर-दक्षिण वा:यांचा वेग वाढल्याने परिणामी नंदुरबार जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आह़े नाशिकसह, जळगाव व नंदुरबारात किमान तापमानात सातत्याने घट बघायला मिळत आह़े तसेच महाबळेश्वरच्या खालोखाल, जळगाव, नाशिक व नंदुरबारच्या किमान तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आह़े
चक्रीवादळा धोका
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्यापूर्वीचे वातावरण दिसून येत आह़े पुढील 24 तासात या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास चक्रीवादळाचाही धोका निर्माण होऊ शकतो़ बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे याचा परिणाम ऋृतुचक्रावर निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे साहजिकच पुढील काही तास निर्णायक ठरणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आह़े 
उत्तर-पूर्व वा:यांनी बिघडू शकते थंडीची स्थिती
सध्या उत्तरेकडून दक्षिणेकडे शितलहरींचा प्रभाव अधिक वाढला आह़े या वा:यांच्या मार्गात कुठलाही अडथळा नसल्याने थंडीतही वाढत होत आह़े परंतु कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन उत्तर-पूर्व वा:यांचा प्रभाव वाढल्यास यातून थंडीचा प्रभाव कमी होऊ शकतो़ सध्या उत्तर-पूर्व  वा:यांची शक्यता कमी असली तरी भविष्यात हा वा:यांचा पट्टा निर्माण होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े
दरम्यान, जिल्ह्याची स्थिती बघता थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आह़े यंदा थंडीचा प्रभाव कमी राहिल असे भाकित हवामान खात्याकडून करण्यात आले असले तरी आतार्पयत जाणवत असलेली थंडी समाधानकारक असल्याचे दिसून येत आह़े येत्या काळी जिल्ह्याचा पारा अजून घसरणार असल्याचा अंदाज आह़े त्यामुळे याचा चांगला परिणाम जिल्ह्यातील रब्बी पिकांवर होणार आह़े गहू व हरभरा पिकांची स्थितीही थंडीमुळे ब:यापैकी असल्याने शेतकरी वर्गातूनही समाधान व्यक्त करण्यात येत आह़े 
 

Web Title: The minimum temperature will fall to ten degrees: Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.