गणित, विज्ञानाच्या गुणवत्तेत नंदुरबार जिल्हा राज्यात दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 07:18 PM2018-01-21T19:18:09+5:302018-01-21T19:18:23+5:30

Mathematics, science and technology, second in Nandurbar district | गणित, विज्ञानाच्या गुणवत्तेत नंदुरबार जिल्हा राज्यात दुसरा

गणित, विज्ञानाच्या गुणवत्तेत नंदुरबार जिल्हा राज्यात दुसरा

Next

रमाकांत पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील 50 टक्के विद्याथ्र्याना लिहिता-वाचता येत नसल्याचा असर संस्थेने दिलेल्या अहवालानंतर राष्ट्रीय शिक्षा अनुसंधान परिषदेने केलेल्या सव्र्हेक्षणात जिल्ह्यातील गुणवत्ता वरचढ ठरली आहे. इयत्ता आठवीच्या मराठी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयासाठी झालेल्या सव्र्हेक्षणात जिल्हा राज्यात दुसरा आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.  सातपुडय़ातील जिल्हा परिषदेच्या पिशवी शाळांचा प्रश्न, शिक्षकांकरवी परस्पर पोटशिक्षक नेमण्याची प्रथा, 22 ते 25 वर्ष वयोगटातील तरुणांना पहिली किंवा दुसरीच्या वर्गात प्रवेश देण्याचे प्रकरणे या सा:याच बाबी शरमेने मान खाली घालाव्या लागण्यासारखे प्रकार याच जिल्ह्यात घडले. 
या पाश्र्वभुमिवर गेल्यावर्षीच केंद्र सरकारने असर संस्थेमार्फत केलेल्या सव्र्हेक्षणातील अहवाल हा धक्कादायक होता. अशा स्थितीत राष्ट्रीय शिक्षा अनुसंधान परिषद अर्थात एनसीईआरटीने केलेल्या सव्र्हेक्षणाचा अहवाल हा निश्चितच दिलासा देणारा व आशादायी      आहे.
या संस्थेमार्फत देशभरात इयत्ता तिसरी, पाचवी या वर्गासाठी भाषा, गणित आणि परिसर अभ्यास हे तीन विषय तर आठवीच्या वर्गासाठी मराठी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या चार विषयांसाठी सव्र्हेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यात आठवीच्या सव्र्हेक्षणात नंदुरबार जिल्हा राज्यात दुसरा आला आहे. त्यात विज्ञान विषयासाठी 50.61, भाषा विषयासाठी 61.35 तर गणित विषयासाठी 50.82 आणि सामाजिक शास्त्रासाठी 52.32 टक्के गुणवत्ता मिळाली आहे. विशेष म्हणजे राज्यात याचे सरासरी प्रमाण अनुक्रमे 39.93, 62.27, 40.04 आणि 41.50 आहे. पहिल्या क्रमांकावर बीड जिल्हा राहिला आहे. 
तिसरीच्या सव्र्हेक्षणात मात्र जिल्हा राज्यात परिसर अभ्यास या विषयात 27 वा, भाषा विषयात 22 वा आणि गणित विषयात 23 व्या क्रमांकावर आहे. पाचवीच्या वर्गाच्या सव्र्हेक्षणात मात्र, समाधानकारक कामगिरी दिसून येते. या सव्र्हेक्षणात जिल्हा राज्यात परिसर अभ्यास विषयासाठी आठव्या, भाषा विषयात 20 व्या आणि गणित विषयात नवव्या क्रमांकावर आहे. 
एकुणच 69 टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात आधीच शिक्षणाच्या नावाची ओरड आहे. सातपुडय़ातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील भौगोलिक स्थितीमुळे अनेक अडचणी असतांना त्यावर मात करीत आता जिल्हाही शिक्षणाच्या बाबतीत पुढे जावू लागला आहे. हे एक आशादायक चित्र आहे. 
तथापी केवळ एका सव्र्हेक्षणावर समाधान न मानता शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी अजूनही अनेक त्रूटी दूर करून परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. किंबहुना असरच्या अहवालावरही गांभिर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
 

Web Title: Mathematics, science and technology, second in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.