बाजारात सीसीआयने उघडले खरेदीचे खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:40 PM2018-12-05T12:40:00+5:302018-12-05T12:40:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या आठ दिवसांपासून  बाजारात उतरलेल्या सीसीआयला मंगळवारी कापूस खरेदीचा मूहूर्त गवसला़ दिवसभरात सीसीआयला नंदुरबार ...

The market opened by CCI in the market | बाजारात सीसीआयने उघडले खरेदीचे खाते

बाजारात सीसीआयने उघडले खरेदीचे खाते

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या आठ दिवसांपासून  बाजारात उतरलेल्या सीसीआयला मंगळवारी कापूस खरेदीचा मूहूर्त गवसला़ दिवसभरात सीसीआयला नंदुरबार तालुक्यातील शेतक:यांनी 80 क्विंटल कापूस विक्री केला़ सीसीआयकडून 5 हजार 450 रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करण्यात आला़ 
नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात गेल्या दीड महिन्यापासून शेतक:यांचा कापूस खरेदी करण्यात येत होता़ यात हमीभावापेक्षा अधिक दर असल्याने खरेदी केंद्रात परवानाधारक दोन व्यापा:यांकडून खरेदी सुरु करण्यात आली होती़ दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर यंदा या केंद्रात कापूस आवक निम्म्यापेक्षा कमी होती़ यातून गेल्या आठवडय़ात दरांमध्ये घसरण झाल्याने शेतक:यांनी रास्तारोकोही केला होता़ यातून कापूस दर घसरल्याने सीसीआयने बाजारात खरेदी करण्याचे जाहिर केले होत़े परंतू व्यापा:यांकडून अधिक दर दिले जात असल्याने सीसीआयला कापूस देण्यास शेतकरी नकार देत होत़े परंतू मंगळवारी कापूस दर हे 5 हजार 468 रुपयार्पयतच असल्याने शेतक:यांनी सीसीआयला कापूस विक्री केला़ दिवसभरात खरेदी केंद्रात 502 क्विंटल कापूस आवक झाली असून यात 80 क्विंटल सीसीआयला मिळाला आह़े 
दरम्यान शहादा येथील सीसीआयच्या प्रतिनिधींना अद्यार्पयत एक बोंडही कापूस खरेदी करता आलेले नाही़ 

Web Title: The market opened by CCI in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.