नंदुरबार जिल्ह्यातील स्वाभिमानी संघटनेचे ऊसतोड बंद आंदोलन तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 01:09 PM2018-11-06T13:09:13+5:302018-11-06T13:09:25+5:30

मंगळवारीही अडवली वाहने

The intense agitation of Swabhimani Sanghatana of Nandurbar district is intense | नंदुरबार जिल्ह्यातील स्वाभिमानी संघटनेचे ऊसतोड बंद आंदोलन तीव्र

नंदुरबार जिल्ह्यातील स्वाभिमानी संघटनेचे ऊसतोड बंद आंदोलन तीव्र

googlenewsNext

नंदुरबार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊसतोड बंद आंदोलनाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. अनेक भागात ऊसतोड बंद आहे. प्रकाशा चौफुलीवर शेतकऱ्यांनी काही वाहने अडवून ठेवली होती. दरम्यान, संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
साखर कारखाने सुरू होताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसतोड बंद आंदोलन सुरू केले आहे. तीन दिवसांपूर्वी प्रकाशा येथे संघटनेची बैठक झाली होती. त्यात अनेक शेतकरी उपस्थित होते. यावेळी विविध मागण्यांसाठी ऊसतोड बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार रविवारपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले. सोमवारी त्याची तीव्रता बºयापैकी दिसून आली. शहादा, तळोदा, नंदुरबार तालुक्यातील अनेक भागात ऊसतोड पुर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. प्रकाशा येथे तळोदा चौफुलीवर ऊसाने भरलेले सात ते आठ ट्रॅक्टर व तीन ते चार ट्रका शेतकºयांनी अडवून ठेवल्या होत्या. सायंकाळी उशीरापर्यंत त्या तेथेच थांबून होत्या.
संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदनही देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, गेल्यावर्षी जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत झालेल्या परिषदेत ऊसला २४०० ते २४५० रुपये भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु कारखान्यांनी अचानक निर्णय फिरवून गाळप हंगामानंतर २१०० रुपये भाव दिला. त्यानंतर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी कारखाना पदाधिकारी व शेतकºयांची संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. थकीत रक्कम मिळवून देण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत.
यंदा सातपुडा कारखान्याने २१५१ रुपये भाव जाहीर केला तर आयन कारखान्याने भाव जाहीर न करताच गाळप हंगाम सुरू केला आहे. आजची स्थिती पहाता शेतकºयांना हा दर परवडणारा नाही. त्यामुळे पुढील मागण्या मान्य होईपर्यंत ऊसतोड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निवेदनावर विभागीय अध्यक्ष घन:शाम चौधरी, जिल्हाकार्याध्यक्ष नथ्थू पाटील, उपाध्यक्ष वसंत पाटील, रवींद्र पाटील, सचिन पाटील, गणेश पाटील, कृष्णदास पाटील, ईश्वर चौधरी, संतोष माळी, पमन पटेल, योगेश पाटील, विजय पाटील, रत्नदीप पाटील, गोरख पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व शेतकºयांच्या सह्या आहेत.
मंगळवारी परिवर्धे येथे ऊसतोड केली बंद
परिवर्धे येथे सातपुडा परिसरा साखर कारखान्याचे संचालक एकनाथ रामू पाटील यांचे मोठे बंधू काशिनाथ रामू पाटील यांच्या शेतात ऊसतोड सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर आंदोलकांनी ही ऊसतोड बंद केली़ तसेच परिवर्धे मार्गाने सातपुडा तापी-परिसर साखर कारखान्याकडे जाणारे ऊसाने भरलेली विविध वाहने अडवण्यात येऊन गावातील माध्यमिक विद्यालयात थांबवण्यात आली़
दरम्यान दुपारी शहादा येथील लोणखेडा चौफुलीवर स्वाभिमानीतर्फे ऊसाने भरलेली वाहने अडवण्यात येत असल्याचे दिसून आले़

Web Title: The intense agitation of Swabhimani Sanghatana of Nandurbar district is intense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.