प्रकाशा येथे अवैधरित्या वाळू वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:21 PM2017-11-19T12:21:44+5:302017-11-19T12:22:01+5:30

Illegal sand transport at light | प्रकाशा येथे अवैधरित्या वाळू वाहतूक

प्रकाशा येथे अवैधरित्या वाळू वाहतूक

Next
कमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा डंपर उपप्रादेशिक परिवहन अधिका:यांनी पकडला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जिगAेश गायकवाड हे या रस्त्यावरून जात असताना त्यांना वाळूने भरलेला डंपर (क्रमांक एमएच 20- सीटी 7607) आढळून आला. गायकवाड यांनी हे डंपर अडवून चालकाकडे कागदपत्रांची तपासणी केली असता रॉयल्टीची पावती नव्हती. तसेच क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहनात होती. त्यामुळे वाळूची अवैध वाहतूक करणारा डंपर प्रकाशा येथील पोलीस दूरक्षेत्रात जमा करण्यात आला. तसेच प्रकाशा येथील एक ट्रॅक्टरही पकडले होते. या वाहनधारकास सात हजारांचा दंड आकारण्यात आला.दरम्यान, या मार्गावरून प्रांताधिकारी व आरटीओ जातात त्याचवेळी त्यांना अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे वाहने सापडतात. मात्र इतरवेळी संबंधित महसूल विभागाच्या अधिका:यांना ही वाहने का दिसून येत नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Illegal sand transport at light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.