सरकारच्या बेपर्वाईमुळे गुजरातने पाणी पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 07:10 PM2018-02-18T19:10:22+5:302018-02-18T19:10:42+5:30

राष्ट्रवादीचा हल्लाबोल : विसरवाडी येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांची सरकारवर टीका

Gujarat has run water due to the government's inadvertence | सरकारच्या बेपर्वाईमुळे गुजरातने पाणी पळवले

सरकारच्या बेपर्वाईमुळे गुजरातने पाणी पळवले

Next


ऑनलाईन लोकमत
विसरवाडी, दि़18 : आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागाने नर्मदा आणि उकाई या दोन धरणांचे पाणी नंदुरबार जिल्ह्याला मिळावे म्हणून तरतूद केली होती़ परंतू सत्तेवर असलेल्या राज्यातील फडणवीस सरकारने केंद्रातील त्यांच्या नेत्यांना खूश करण्यासाठी हे पाणी गुजरातला देऊन टाकल़े या बेपवाईमूळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला़
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी विसरवाडी ता़ नवापूर येथील दुय्यम बाजार समितीच्या आवारात राज्यस्तरीय हल्लाबोल आंदोलनांतर्गत सभा घेण्यात आली़ यावेळी प्रदेशाध्यक्ष तटकरे बोलत होत़े सभेस खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, महिला सेलच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, माजी आमदार शरद गावीत, नंदुरबार जिल्हा प्रभारी उमेश पाटील, शहादा तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील, नवापूर तालुकाध्यक्ष विनायक गावीत, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, युवती सभेच्या अर्चना गावीत, नवापूर पालिकेचे गटनेते नरेंद्र नगराळे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ़ अर्चना नगराळे, नगरसेविका सविता नगराळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होत़े
पुढे बोलताना तटकरे म्हणाले की, नंदुरबार जिल्हा हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला बळ देणारा आह़े देशाच्या भाबडय़ा जनतेने भाजपाच्या खोटय़ा आश्वासनांकडे आकर्षित होऊन मत दिल़े मात्र प्रत्यक्षात ्त्यांच्या हाती काहीच आलेले नाही़ या सरकारने 15 लाख रूपये देण्याचं खोट आश्वासन दिलं़ तरूणांना दिला नाही, याउलट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री यांनी मेक इन महाराष्ट्र नावाने आठ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक येणार असल्याचं सांगितलं़ प्रत्यक्षात कुठे आहे गुंतवणूक झालेला जिल्हा, तालुका आणि गाव हे ते सांगत नाहीत़ आज कुपोषणाचा प्रश्न पुन्हा डोकेवर काढत आह़े कुपोषणमुक्तीसाठी शरद पवारांची भूमिका होती़ त्यांनीच आदिवासी बांधवांसाठी कायदा करून अर्थसंकल्पात 9 टक्के निधी देण्याची तरतूद केली़ साडेतीन वर्षात काय पदरात पडलं, याचा विचार केला तर फक्त फसवणूक हमीभाव, शाश्वत नोक:या ही फसवेगिरी, शेतक:यांच्या पदरी आत्महत्या वाढल्या, अजून किती धर्मा पाटील यांना हवे आहेत, ते त्यांनी सांगाव़े
चित्रा वाघ यांनी सांगितले की, साडेतीन वर्षापूर्वी आश्वासनांचा पाऊस पडला आह़े सत्तेतील सरकारला या आश्वासनांची आठवण आता करून देण्याची गरज आह़े यापूर्वी धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्याचा दौरा केला आह़े अजूनही बालक कुपोषित आहेत़ कुपोषित मुलांचा विशेष आहार देण्याची आघाडी सरकाच्या काळातील योजना बंद आह़े सरकार गेंडय़ांच्या कातडीचे झाले आह़े महिला सुरक्षित नाहीत़ मुलींचा जन्मदर कमी होत आह़े शेकडो युवक आणि नोकरदारांना नोटबंदीनंतर बेरोजगारीला सामोरे जावे लागत आह़े सरकारच्या कुचकामी निर्णयामुळे सतावलेले रस्त्यावर आलेले आहेत़ यामुळे सतत कुठे ना कुठे आंदोलन आणि आक्रोश सुरू आह़े
उमेश पाटील यांनी सांगितले नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आह़े या जिल्ह्यात भाजपाच विचार रूजला नाही़ जिल्ह्याने धर्मनिरपेक्ष विचाराला साथ दिली आह़े आघाडी सरकारच्या काळात आदिवासी विकास विभागाच्या योजना राष्ट्रवादीने रूजवल्याने त्या घराघरार्पयत पोहोचल्या होत्या़ मात्र भाजपाच्या राजवटीत आदिवासी विकासाच्या योजना बंद केल्या आहेत़ हा आदिवासींचा अपमान आह़े

Web Title: Gujarat has run water due to the government's inadvertence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.