नंदुरबार जिल्ह्याची भूजल पातळी दीड मीटर खोलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:21 PM2018-02-06T13:21:15+5:302018-02-06T13:21:20+5:30

The ground water level of Nandurbar district is 1.5 meters | नंदुरबार जिल्ह्याची भूजल पातळी दीड मीटर खोलात

नंदुरबार जिल्ह्याची भूजल पातळी दीड मीटर खोलात

Next

भूषण रामराजे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सरासरी 1 हजार 100 मीटर पावसाची नोंद होणा:या जिल्ह्यात यंदा केवळ 83 टक्के पाऊस झाला़ खालावलेल्या पजर्न्यमानाचा परिणाम भूजल पातळीत दिसून येत असून जिल्ह्याची भूजल पातळी 1़56 अर्थात दीड मीटरने खालावल्याचा अहवाल भूजल सव्रेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी दिला आह़े 
सप्टेंबर 2017 मध्ये भूजल सव्रेक्षण विभागाने सहा तालुक्यातील 50 विहिरींचे शास्त्रीय पद्धतीने केलेल्या सव्रेक्षणानंतर निष्कर्ष समोर आले आहेत़ वेळोवेळी भूजल पातळी ही कमी होणार असल्याचे संकेत अहवालात दिले असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात काही ठिकाणी भीषण तर काही ठिकाणी मध्यम पाणीटंचाई निर्माण होणार आह़े संबधित विभागाने सहा तालुक्यातील पजर्न्यमानाचे सव्रेक्षण राबवले होत़े यात एकाच तालुक्यात पजर्न्यमान वाढल्याची माहिती समोर आली आह़े सप्टेंबर महिन्यात भूजलाचे सव्रेक्षण करणा:या विभागाने जिल्ह्यातील तालुक्यांच्या सरासरी पजर्न्यमानात वाढ झाली किंवा कसे, याची पडताळणी करण्याची मोहिम राबवली होती़ यात दोन तालुक्यात 10 टक्क्यांपेक्षा तर तीन तालुक्यात 10 ते 20 टक्के पजर्न्यमान घटल्याची माहिती समोर आली आह़े 
पजर्न्यमानवाढीच्या सव्रेक्षणानुसार केवळ शहादा  तालुक्यात 10 ते 20 टक्के पजर्न्यमान वाढल्याचे स्पष्ट झाले आह़े उर्वरित नंदुरबार, धडगाव, तळोदा, नवापूर आणि अक्कलकुवा तालुक्याच्या पजर्न्यमानात 10 ते 20 टक्के घट झाली असल्याचा अहवाल आह़े 
यंत्रणेने राबवलेल्या सव्रेक्षणात 15 विहिरींची पातळी एक मीटर किंवा त्यापेक्षा अधिक खोल गेली होती़ यात अक्कलकुवा तालुका- करणपाडा (3़22 मीटर), नंदुरबार तालुका-समरेशरपूर (76 इंच), ढेकवद (1़31 मीटर), धानोरा (68 इंच), सुंदरदे (1़18 मीटर), लोय (85 इंच), नवापूर तालुका- कामोद (1़12 मी), खोलविहिर (94 इंच), विसरवाडी (1़26 मी), डोकारे (1़15), श्रावणी (80 इंच), वरकळंबी (1़65 मी), शहादा तालुका-सोनवद (1़50 मी), जयनगर येथे 1़23 मीटर पाणी पातळी खालावली आह़े
 

Web Title: The ground water level of Nandurbar district is 1.5 meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.