जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By admin | Published: February 21, 2017 04:55 AM2017-02-21T04:55:40+5:302017-02-21T04:55:40+5:30

वनहक्क आणि पेसा कायद्याची जिल्ह्यात अंमलबजावणी करावी, वनहक्के दावे निकाली काढावे या मागणीसाठी

Front of District Collectorate | जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Next

नंदुरबार : वनहक्क आणि पेसा कायद्याची जिल्ह्यात अंमलबजावणी करावी, वनहक्के दावे निकाली काढावे या मागणीसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्त्वाखाली शेकडो आदिवासी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. रात्री उशिरापर्यंत त्यांची प्रशासनाशी चर्चा सुरूच होती.
वनहक्क दावे निकाली काढले जात नसल्याचा आरोप करीत आणि पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी लोक संघर्ष मोर्चातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सायंकाळी पावणेपाच वाजता मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रतिभा शिंदे यांच्यासह माजी आमदार पद्माकर वळवी, जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी, जि.प.चे कार्यकारी अधिकारी घन:शाम मंगळे आदी बैठकीला उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत आंदोलकांशी चर्चा सुरूच होती. (प्रतिनिधी)

Web Title: Front of District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.