धरण फुटल्याच्या अफवेने नवापूरात भितीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 01:43 PM2018-08-19T13:43:19+5:302018-08-19T13:43:26+5:30

नवापूरातील महाप्रलय : मदत व पुनर्वसनावर भर, पाचव्या मृतदेहाची ओळख पटेना

Fear of the dam is a new horror atmosphere | धरण फुटल्याच्या अफवेने नवापूरात भितीचे वातावरण

धरण फुटल्याच्या अफवेने नवापूरात भितीचे वातावरण

Next

नवापूर : अतिवृष्टीच्या प्रलयानंतर आता मदतकार्य आणि पुनर्वसनावर प्रशासनातर्फे भर देण्यात येत आहे. पाणी ओसरल्याने आणि पावसानेही उसंत घेतल्याने नागरिकांना धिर आला आहे. रंगावली धरण फुटल्याची अफवा रात्रीपासून पसरली, परंतु अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिका:यांनी केले. बंधारे येथील बेवारसची ओळख पटलेली नाही.
रंगावली व सिरपणी नदीच्या महापुरानंतर आता जनजिवन पुर्वपदावर येत आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना उभे करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांवर भर दिला आहे. जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी दिवसभर ठाण मांडून होते. 
मतदीचा ओघ सुरू
रंगावली नदीच्या महापुरात नुकसान झालेल्या नागरिकांसाठी शहरातून व शहराबाहेरून मदतीचा ओघ सुरू आहे. पालिकेकडून सफाई अभियानाला वेग देण्यात आला. राजीवनगरातील आठ घरे व भगतवाडी पुलफळी येथील 68 घरे वाहून गेली. त्या 76 कुटूंबांसाठी हनुमानवाडीचे सभागृह व पालिकेचे बहुउद्देशीय भवनात राहण्याची व जेवनाची सोय करण्यात आली आहे. राजीवनगर, भगतवाडी व महादेवगल्ली येथे स्वयंपाकाची सोय सामाजिक कार्यकत्र्याकडून करण्यात आली. त्यासाठी शेकडो स्वयंसेवक महिला, पुरुष राबत आहेत.  सोमवारी आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. हनुमानवाडीत त्यासाठी सोय करण्यात आली आहे. 
वाहतूक धिम्या गतीने
विसरवाडी ते दहिवेल दरम्यान रस्त्याचा खचलेल्या भरावाच्या ठिकाणी शनिवारी सायंकाळर्पयत काम सुरू होते. परिणामी जड वाहने आणि एस.टी.महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसेस या नंदुरबार, निजामपूर, साक्रीमार्गे वळविण्यात आल्या होत्या.नवापूर : रंगावली धरणास जिल्हाधिका:यांनी शनिवारी सकाळी भेट देवून पहाणी केली. शिवाय पाणी पाझरत असलेल्या ठिकाणी तातडीने दुरूस्ती केली. दरम्यान, कुकराण येथील साठवण बंधा:याचा खचलेला भराव युद्धपातळीवर पूर्ववत करण्यात आला.
रंगावली धरणाच्या मुख्य भिंतीला मोठे भगदाड पडले असून धरण फुटेल अशी अफवा शुक्रवारी रात्रीपासून पसरली होती. काहींनी नदीकिणारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचाही सल्ला दिला होता. या अफवेची खातरजमा करण्यासाठी अनेकांनी धरणाच्या ठिकाणी धाव घेतली. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी सकाळी तातडीने धरणस्थळी भेट दिली. सोबत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार राजेंद्र नजन, पोलीस निरिक्षक विजयसिंह राजपूत यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. धरणाच्या मुख्य दरवाजापासून पाच मिटर अंतरावर एका ठिकाणी पाणी पाझरत असल्याचे अधिका:यांना दिसून आले. तेथे पहाणी केली असता पाझरणारे पाण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे स्पष्ट झाले. त्या ठिकाणी तातडीने दगड व मातीची पिचिंग करण्यात आली. हे काम होईर्पयत स्वत: जिल्हाधिकारी तेथे थांबून होते. धरणाला कुठलाही धोका नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सद्य स्थितीत रंगावली धरण पुर्णपणे भरले असून सांडव्यातून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. दरम्यान, कुकराण येथे जिल्हा परिषदेच्या साठवण बंधा:याची सांडव्याकडील मुख्य बाजुचा मातीचा भराव मोठय़ा प्रमाणात वाहून गेला होता. तहसीलदार राजेंद्र नजन यांनी प्रत्यक्ष भेट देवून पहाणी केली.  दुपारी भराव पूर्ववत करण्यात आला. सोनखडके व कोळदा येथील रहिवाशांनी यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकला.अतिवृष्टी व पुरामुळे वाहून गेलेले पूल व रस्ते कामांचे आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी दिल्या. दरम्यान, सोमवारपासून तीन ठिकाणी मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
तहसील कार्यालयात जिल्हाधिका:यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. सर्वच विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले, मेलेल्या जनावरांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी. तालुक्यात जनावारांना लसीकरणाच्या मोहिमेला वेग द्यावा. ज्या ठिकाणी विद्युत पोल, रोहित्र खराब झाले आहेत, तारा तुटल्या आहेत त्या ठिकाणी तातडीने दुरूस्तीच्या कामांना वेग देवून वीज पुरवठा सुरळीत करण्याचेही त्यांनी सांगितले. पिकांचे नुकसानीचे पंचनामे पुर्ण करावे. बोकळझर येथील वाहून गेलेल्या बंधा:याची पुनर्रबांधणी करण्यासाठी लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. सोमवारपासू पालिका, तहसील व गटविकास अधिकारी कार्यालयात त्या त्या विभागांचे मदत केंद्र सुरू करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
 

Web Title: Fear of the dam is a new horror atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.