पारंपरिक पिके सोडून सातपुड्यातील शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे कल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:27 AM2021-04-14T04:27:55+5:302021-04-14T04:27:55+5:30

सातपुड्यातील शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या काळ्या गव्हाचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य ...

Farmers in Satpuda shift from traditional crops to cash crops! | पारंपरिक पिके सोडून सातपुड्यातील शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे कल!

पारंपरिक पिके सोडून सातपुड्यातील शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे कल!

Next

सातपुड्यातील शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या काळ्या गव्हाचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे.

यात दुर्गम भागातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी पारंपरिक पिकांची पारंपरिक पद्धतीने काळ्या गव्हाची लागवड केली आहे. सातपुड्यातील माती ही खडकाळ व मुरमाळ आहे. त्यामुळे या परिसरात पारंपरिक पिकांना प्राधान्य दिले जाते. बदलते वातावरण आणि तंत्रज्ञान तसेच सुयोग्य मार्गदर्शन याची सांगड घालत बऱ्याच क्षेत्रावर आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या काळ्या गव्हाची लागवड शेतकऱ्यांनी आहे.

सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी शेतकऱ्यांना पंजाब राज्यातील मोहाली येथून काळ्या गव्हाचे बियाणे उपलब्ध करून दिले आहे.

आयुर्वेदिक काळा गहू

आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या काळ्या गव्हात एनथोसायनिन पिगमेंटची मात्रा ४० ते १४० तर कॅलरी ३४३ ग्रॅम, पाणी, १० टक्के, प्रोटीन १३.३ ग्रॅम, कार्ब्स ७१.५ ग्रॅम, साखर ० ग्रॅम, फायबर १० ग्रॅम, वसा ३.४ ग्रॅम व कार्बोहायड्रेट आदी घटक पदार्थ मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे काळ्या गव्हाच्या सेवनाने मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, हार्ट अटॅक, मानसिक आजार अशा १२ आजारांत निश्चित सुधार होत असल्याची भावना ग्राहकांमध्ये आहे. काळ्या गव्हाच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत मिळत आहे.

होतेय आगाऊ मागणी

काळ्या गव्हाची आगाऊ मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने हा गहू शेतकऱ्यांच्या शेतातून सरळ ग्राहकांना योग्य दरात घरपोच दिला जातोय. यामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघांचे हित जोपासले जात आहे.

एकरी २० क्विंटल उत्पादन

एकरी साधारणपणे १५ ते २० क्विंटल उत्पादन होत असून ५,५०० ते ६,००० रुपये क्विंटल भाव शेतकऱ्यांना मिळतोय.

इतर राज्यात दिलेले काळे गहू शेतकरी आठ हजार रुपयेपर्यंत क्विंटल विकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडत असून शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

लागवडीनंतर काळ्या गव्हाची काळजी कशी घ्यावी, याबाबत सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी सातपुड्यातील विकास तडवी यांच्या शेतात थेट भेट दिली व परिसरातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनही करीत आहेत.

Web Title: Farmers in Satpuda shift from traditional crops to cash crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.