गतीमान व संवेदनशील प्रशासनाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:19 AM2019-07-19T11:19:19+5:302019-07-19T11:19:24+5:30

रमाकांत पाटील।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड व जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र         ...

Expectation of dynamic and sensitive administration | गतीमान व संवेदनशील प्रशासनाची अपेक्षा

गतीमान व संवेदनशील प्रशासनाची अपेक्षा

Next

रमाकांत पाटील। 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड व जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र          पंडित या दोन्ही अधिका:यांनी  गुरुवारी एकाच दिवशी पदभार सांभाळला आहे. हे दोन्ही अधिकारी संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची चर्चा यापूर्वीच झाल्याने नंदुरबार जिल्ह्यात त्यांनी पदभार सांभाळल्यानंतर त्यांच्याकडून गतीमान व संवेदनशील प्रशासनाची अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या बदलीनंतर बालाजी मंजुळे यांनी पदभार सांभाळला होता. डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या काळात अतिशय संवेदनशील प्रशासन म्हणून त्यांनी आपली छाप जिल्ह्यात उमटवली होती. कुणीही त्यांच्याकडे समस्या घेऊन जावे आणि त्याची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करणे ही त्यांची कामाची पद्धत होती. अनेक प्रश्न गुंतागुंतीचे, नियमबाह्य असल्याने भले त्याची सोडवणूक झाली नसेल पण प्रशासक म्हणून ते नोंद घेत असे. त्यामुळे ते जिल्ह्यात अतिशय लोकप्रिय जिल्हाधिकारी म्हणून           त्यांनी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या बदलीनंतर बालाजी               मंजुळे यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीपूर्वीही त्यांच्या कर्तृत्वाच्या चर्चा सोशल मिडीयावरुन झाली. त्यामुळे लोकांना त्यांच्याकडूनही खूप अपेक्षा होत्या. पण गेल्या पाच महिन्यातच त्यांची बदली झाली. या काळात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. पण त्यानंतरच्या काळात प्रशासनात मरगळ आल्याचे चित्र लोकांनी अनुभवले. जिल्ह्यात आधीच दुष्काळाने जनता त्रस्त आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात वृत्तपत्रातून सातत्याने टंचाई व दुष्काळातील जनतेच्या समस्यांबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले. लोकांची निवेदनेही प्रशासनाकडे गेली. पण पाहिजे तेवढय़ा गांभीर्याने टंचाईची दखल घेतली गेली नाही. शेतक:यांसाठी शासनाकडून बोंडअळी, दुष्काळ व इतर अनुदान देण्यात आले. अनेक शेतक:यांचे अनुदान दुस:याच्या खात्यावर जमा झाले. प्रशासनाची ही चूक असताना गेल्या चार-चार महिन्यांपासून लोक चकरा मारीत असताना त्यांचे प्रश्न सुटले नाहीत. महसूल विभागाच्या ऑनलाईन नोंदीत त्रुटी असताना त्या त्रुटी दुरुस्तीसाठीही शेतक:यांना सातत्याने या कार्यालयातून त्या कार्यालयात चकरा माराव्या लागतात. वेळीच त्याची दखल घेतली जात नाही. कृषी विभागाच्या कार्यपद्धतीबाबतही जनतेच्या तक्रारी आहेत. असे छोटे छोटे अनेक प्रश्न आहेत ज्यामुळे लोकांना प्रशासनाचा चांगला अनुभव येत नसल्याने लोक त्रस्त होतात.
नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग दुर्गम-अतिदुर्गम भागात आहे. या भागात अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याची तक्रार नित्याचीच आहे. जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे परंतु त्याचे वास्तव चित्र समोर येत नाही. बालमृत्यू व कुपोषित बालकांच्या नोंदीच बरोबर होत नसल्याने कागदावर प्रत्यक्षात कमी संख्या दाखवली जाते. हे वास्तव चित्र समोर यावे व उपाययोजना प्रभावी करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातून रोजगारासाठी हजारो कुटुंब स्थलांतरित होतात. या स्थलांतराचे सव्रेक्षण करून उपाययोजना आवश्यक आहे. रोजगार हमी योजना अजूनही लोकांचा विश्वास संपादीत करू शकलेली नाही. त्यामुळे त्यातील त्रुटी दूर करून ही योजना प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता आहे.
एकूणच नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी, गरीब, निरक्षर लोकांची संख्या अधिक आहे. शोषित, पीडितांची संख्याही मोठी आहे. अशा स्थितीत एक संवेदनशील मनाचा आणि तरुणाईसाठी प्रेरणादायी असलेले जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड हेच या जिल्ह्याला लाभल्याने साहजिकच लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. विशेषत: त्यांच्या आईची व्हीडीओ क्लीप सोशल मिडीयावर सध्या अधिक चर्चेत आहे. या आईने आपल्या पुत्राच्या हातून गोरगरीब जनतेची सेवा घडो, त्यातच आपल्याला आनंद असल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हाधिका:यांच्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी या जिल्ह्यात त्यांना खूप वाव आहे. ते आपल्या कार्यशैलीने साकार करतील, अशी अपेक्षा सर्वानाच लागून आहे. विशेष म्हणजे त्यांचे माध्यमिक शिक्षण या जिल्ह्यातच झाल्याने या जिल्ह्याशी ते यापूर्वीच परिचित आहेत. 
दुसरीकडे गडचिरोलीसारख्या नक्षलवादी जिल्ह्यात आपले कर्तृत्व गाजवणारे नवीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हेदेखील जिल्ह्याला लाभले आहेत. यापूर्वी संजय पाटील यांनी दोन वर्षात जिल्ह्यात पोलीस दलाची चांगली ओळख करून            दिली आहे. तेदेखील लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते. त्यामुळे पोलीस आणि जनतेतील संवाद जरी चांगला असला तरी तो अजून मजबूत करण्याची गरज आहे. याशिवाय नर्मदा काठावरील होणारी रेशनची तस्करी, नंदुरबार हा गुजरात व मध्य प्रदेशच्या सीमेवरील जिल्हा असल्याने आंतरराज्य गुन्हेगारीवर वचक मिळविण्यासाठी, अवैध दारु विक्री, खुलेआम सुरू असलेला सट्टा, जुगाराचे अड्डे त्याला प्रतिबंध करण्याची गरज आहे. पोलीस अधीक्षक पंडित हेदेखील एक संवेदनशील अधिकारी असल्याने त्यांच्याकडूनही जनतेच्या अनेक अपेक्षा लागून आहेत.
 

Web Title: Expectation of dynamic and sensitive administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.