खांडबारा-भादवड दरम्यान शस्त्राचा धाक दाखवून जबरी लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:38 PM2017-11-25T12:38:49+5:302017-11-25T12:38:49+5:30

During the Khandbara-Bhadwad, the robbery of arms looted | खांडबारा-भादवड दरम्यान शस्त्राचा धाक दाखवून जबरी लूट

खांडबारा-भादवड दरम्यान शस्त्राचा धाक दाखवून जबरी लूट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खांडबारा ते भादवड दरम्यान दुचाकीस्वाराला जबरीने थांबवत त्याच्याकडील मुद्देमालाची लूट करत तिघांनी पळ काढला़ गुरूवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ 
नंदुरबार येथील जामा मस्जिद परिसरात राहणारे एजाज खान शेरखान पठाण गुरूवारी सायंकाळी खांडबारा येथील व्यवसाय आटोपून दुचाकीने नंदुरबारकडे येत असताना नंदुरबार-खांडबारा रस्त्यावर भादवड गावाजवळ पठाण यांच्या दुचाकीसमोर तिघेजण आडवे आल़े अचानक आलेल्या तिघांमुळे पठाण यांनी दुचाकी थांबवल्यानंतर तिघांनी त्यांच्यावर झडप घालत दुचाकी खाली पाडली़ रस्ता निजर्न असल्याने हा प्रकार लक्षात आला नाही़ तिघा लुटारूंनी पठाण यांच्याकडील 9 हजार 600 रूपये रोख, 8 हजार 500 रूपये किमतीचे दोन प्रत्येकी 500 रूपये किमतीचे दोन, दोन हजार रूपये किमतीचे बायोमेट्रिेक डिवाईस, 725 रूपयांचे मोबाईल रिचार्ज व्हाऊचर यासह आठ मोबाईल सिमकार्ड असा एकूण 21 हजार 825 रूपये किमतीचा मुद्देमाल काढून घटनास्थळावरून पळ काढला़ एजाज पठाण यांनी विसरवाडी पोलीस ठाणे गाठून रात्री उशिरा फिर्याद दिल्यानंतर तिघा चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आह़े 

Web Title: During the Khandbara-Bhadwad, the robbery of arms looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.