जमाना ग्रामीण रूग्णालयातून दरवाजांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:37 PM2017-08-17T12:37:23+5:302017-08-17T12:37:23+5:30

नव्या इमारतीत प्रकार : मोलगी पोलीस ठाण्यात तक्रार

Door stolen from the rural hospital | जमाना ग्रामीण रूग्णालयातून दरवाजांची चोरी

जमाना ग्रामीण रूग्णालयातून दरवाजांची चोरी

Next
ठळक मुद्देबांधकाम विभागाच्या मोटारी गायब 12 ऑगस्ट रोजी रात्री चोरी होत असताना चोरटय़ांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती तक्रारी अर्जात देण्यात आली आह़े जमाना ग्रामीण रूग्णालयाच्या आवारातून यापूर्वीही दोन पाण्याच्या मोटारी चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता़ सार्वजनि

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जमाना ता़ अक्कलकुवा येथे नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीचे 16 दरवाजे आणि टाईल्स  चोरटय़ांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े दुर्गम भागात चेारटे सक्रीय झाल्याने चिंता व्यक्त होत आह़े 
जमाना ग्रामीण रूग्णालयाच्या अद्ययावत आणि सुसज्ज इमारतीचे बांधकाम गेल्या काही दिवसांपासून सुरू आह़े यासाठी गत आठवडय़ात विविध खोल्यांना लावण्यासाठी 80 दरवाजे आणि 80 टाईल्सचे बॉक्स बांधकाम पूर्ण करणा:या ठेकेदाराकडून आणण्यात आले होत़े ही साधने याठिकाणी ठेवली असता, 12 ऑगस्ट रोजी चोरटय़ांनी चोरून नेल्याचे कामगारांना दिसून आल़े त्यांनी ही बाब संबधित ठेकेदाराला कळवली, त्यांनी मोलगी पोलीस ठाण्यात अर्ज दाखल करून कारवाईची मागणी केली आह़े 10 हजार रूपयांचा एक दरवाजा आणि सात हजार रूपयांचा टाईल्सचा एक बॉक्स असे सुमारे सात लाख 50 हजार रूपयांचा माल चोरीला गेल्याने रूग्णालयाच्या बांधकामावर परिणाम झाल्याची माहिती देण्यात आली आह़े चोरीच्या या प्रकाराबाबत संबधित ठेकेदार सुनील बोरसे यांनी मोलगी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला आह़े आरोग्य विभाग आणि जमाना ग्रामीण रूग्णालय प्रशासनानेही चोरी झाल्याच्या प्रकाराला दुजोरा दिला आह़े

Web Title: Door stolen from the rural hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.