लग्नखर्चाचा वाद : वरबापाची मुलीच्या आईबाबांना मारहाण

By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: January 2, 2024 04:40 PM2024-01-02T16:40:52+5:302024-01-02T16:41:31+5:30

सांगा पांड्या पाडवी व लाडकीबाई पांड्या पाडवी असे मारहाण झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. 

Dispute over marriage expenses: Father-in-law beat daughter's parents | लग्नखर्चाचा वाद : वरबापाची मुलीच्या आईबाबांना मारहाण

लग्नखर्चाचा वाद : वरबापाची मुलीच्या आईबाबांना मारहाण

नंदुरबार : लग्नाचा खर्च देण्याच्या वादातून मुलाच्या वडिलांनी मुलीच्या आई-वडिलांना मारहाण केल्याचा प्रकार धडगाव तालुक्यातील त्रिशूल बुबदई पाडा येथे घडला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल आहे. सांगा पांड्या पाडवी व लाडकीबाई पांड्या पाडवी असे मारहाण झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. 

सांगा व लाडकीबाई यांच्या कन्येचा विवाह गावातील धन्या गोन्या पावरा (५५) याच्या मुलासोबत झाला होता. लग्नात पती-पत्नीने खर्च द्यावा, अशी मागणी धन्या पावरा याने केली होती. परंतु, सांगा पाडवी व लाडकीबाई यांनी त्यास नकार दिला होता. यामुळे धन्या पावरा याने पाडवी दाम्पत्यासोबत वाद घालत ३१ डिसेंबर रोजी दोघांना दगडाने मारून जखमी केले. याप्रकरणी लाडकीबाई सांगा पाडवी यांनी धडगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित धन्या गोन्या पावरा (५५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हेड काॅन्स्टेबल स्वप्निल गोसावी करत आहेत.

Web Title: Dispute over marriage expenses: Father-in-law beat daughter's parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न