‘ओखी’मुळे भाविक प्रकाशात अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:37 PM2017-12-09T12:37:55+5:302017-12-09T12:38:51+5:30

The devotees got stuck in the light due to 'Okhi' | ‘ओखी’मुळे भाविक प्रकाशात अडकले

‘ओखी’मुळे भाविक प्रकाशात अडकले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : ओखीचे वादळ गुजरात किनारपट्टीवर धडकल्याने नर्मदा परिक्रमा करणारे भाविक प्रकाशा येथे अडकले आहे. जोर्पयत सुरत येथून जिल्हाधिका:यांचा आदेश येत नाही तोर्पयत हे भाविक येथेच राहतील, असे त्यांच्या मुख्यालयातर्फे सांगण्यात आले. गेल्या पाच दिवसांपासून भाविक येथे थांबून आहेत.
नर्मदा व तापी परिक्रमा करणारे भाविक प्रकाशा येथून पुढे जातात. त्यामुळे त्यांचा प्रकाशा येथे मुक्काम असतो. मध्य प्रदेशातून तापी परिक्रमासाठी निघालेले शेकडो भाविक प्रकाशा येथे गेल्या पाच दिवसांपासून मुक्कामी आहेत. काही भाविक पायी परिक्रमा करणारे आहेत तर काही वाहनाने प्रवास करणारे आहेत. या भाविकांची वाहने          सद्गुरू धर्मशाळा व केदारेश्वर मंदिर परिसरात थांबून आहेत. यात 10 ट्रॅव्हल्स व पाच ते सहा खाजगी वाहने आहेत. गेल्या पाच दिवसापासून थांबून असल्याने ते येथून निघण्याची वाट पाहात आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था असली तरी खाण्या-पिण्यासाठी त्यांचा अतिरिक्त खर्च होत आहे.
नर्मदा परिक्रमेसाठी प्रकाशाहून गुजरात राज्यात बिमलेश्वर गावाहून नावेवर बसून चार तास प्रवास करून मिठीनकाई येथे पोहोचावे लागते. हा प्रवास समुद्रातून करावा लागतो. मात्र ओखी वादळामुळे तेथील जिल्हाधिका:यांनी हा मार्ग बंद केल्याचे समजते. जोर्पयत पुढील आदेश मिळत नाही तोर्पयत भाविकांना पुढे जाता येणार नाही. त्यामुळे भाविक याठिकाणी थांबून आहेत. येथील सद्गुरू धर्मशाळेत परिक्रमा करणा:या भाविकांनी संख्या वाढत असल्याने याठिकाणी एक दिवसाच्या मुक्कामासाठी एका भाविकाला 20 रुपये भाडे द्यावे लागते.
गेल्या 15 दिवसांपासून गावातून परिक्रमेसाठी निघालो असून पाच दिवसांपासून याठिकाणी थांबून आहोत. सोबत 50 यात्रेकरू असून, जेवणाची व्यवस्था ट्रॅव्हल्सवाले करतात. मात्र राहण्यासाठी व इतर कामासाठी खर्च होतो. शिवाय वेळेवर पोहोचलो नाही तर यात्राही पूर्ण होणार नाही म्हणून पुढील आदेशाची वाट पाहत असल्याची माहिती होशंगाबाद येथील चंद्रभानसिंग पोली या भाविकाने दिली. 
भाविकांची संख्या वाढत असली तरी आम्ही त्यांची व्यवस्था करीत असल्याचे सद्गुरू धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन चौधरी यांनी सांगितले.

Web Title: The devotees got stuck in the light due to 'Okhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.