आश्रमशाळेतील विद्याथ्र्याचा मृत्यू, संतप्त जमावाची तळोदा प्रांताधिंकारी व तहसीलदारांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:42 PM2018-08-27T12:42:08+5:302018-08-27T12:42:24+5:30

The death of the ashram school, death of an angry mob, Taloda repatriation and tehsildars | आश्रमशाळेतील विद्याथ्र्याचा मृत्यू, संतप्त जमावाची तळोदा प्रांताधिंकारी व तहसीलदारांना मारहाण

आश्रमशाळेतील विद्याथ्र्याचा मृत्यू, संतप्त जमावाची तळोदा प्रांताधिंकारी व तहसीलदारांना मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सलसाडी, ता.तळोदा येथील शासकीय आश्रम शाळेतील विद्याथ्र्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत जमावाने तळोदा आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा प्रांताधिकारी विनय गौडा व तहसीलदार योगेश चंद्रे यांना मारहाण केली. दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सचिन चंद्रसिंग मोरे (11) रा.गढीकोठडा, ता.तळोदा हा पाचवीचा विद्यार्थी सकाळी आश्रमशाळेतील कुपनलिकेचे बटन सुरू करण्यासाठी गेला असता त्याला शॉक लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही बाब गावातील लोकांना व पालकांना समजताच शेकडोंचा जमाव शाळेत जमला. या ठिकाणी भेट देण्यासाठी आदिवासी प्रकल्प अधिकारी विनय गौडा व तहसीलदार योगेश चंद्रे गेले असता त्यांना जमावाच्या संतापाला सामोरे जावे लागले. जमावाने दोघांना धक्काबुकी करीत मारहाण देखील केली. दोघे त्यात जखमी झाले. दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यासंदर्भात दुपारी उशीरार्पयत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे आदिवासी विकास विभागात खळबळ उडाली आहे.


 

Web Title: The death of the ashram school, death of an angry mob, Taloda repatriation and tehsildars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.