शुभारंभालाच कापसाला 5,868 रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:07 AM2018-10-16T11:07:50+5:302018-10-16T11:07:55+5:30

कापूस खरेदी : नंदुरबार बाजार समितीत सुरुवात

Cotton price of cotton at Rs 5,868 | शुभारंभालाच कापसाला 5,868 रुपये भाव

शुभारंभालाच कापसाला 5,868 रुपये भाव

Next

नंदुरबार : कापूस उत्पादक शेतक:यांच्या सोयीसाठी नंदुरबार बाजार समितीतर्फे यंदाही कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. बाजार समितीच्या परवानाधारक व्यापा:यांकडून येथे कापूस खरेदी करण्यात येत आहे. शुभारंभाच्या दिवशीच कापसाला येथे जास्तीत जास्त 5,868 रुपये भाव मिळाला. यामुळे शेतक:यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
नंदुरबार बाजार समितीतर्फे दरवर्षी पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात परिसरातील शेतक:यांचा कापूस खरेदी केला जातो. या ठिकाणी परवानाधारक शेतक:यांसह सीसीआयतर्फे देखील खरेदी होते. यंदा मात्र, सीसीआयची खरेदी लांबली आहे. त्यामुळे परवानाधारक शेतक:यांनीच या ठिकाणी खरेदीला सुरुवात केली आहे. सोमवारी खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. बाजार समितीचे सभापती देवमन पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसभापती हरिश्चंद्र पाटील, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के.पाटील, संचालक डॉ.सयाजी मोरे, राजाराम पाटील, हिरालाल पाटील, आनंदराव कदमबांडे, संभाजी वसावे, बापू पाटील, बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यंदा शुभारंभालाच चांगला भाव मिळाल्याने शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पहिल्या दिवशी एकुण 12 वाहनांमधून 200 क्विंटल कापूस आवक झाली. प्रतवारीनुसार कमीतकमी 5,550 रुपये ते 5,868 रुपये क्विंटल असा भाव मिळाला. यामुळे शेतक:यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. 
यापुढेही भाव वाढण्याची शक्यता कायम आहे. यावेळी बोलतांना देवमन पवार यांनी सांगितले, बाजार समितीत कापूस विक्री केल्यास शासनाने बोनस किंवा इतर तत्सम निर्णय घेतल्यास ते शेतक:यांना मिळू शकेल. 
खाजगी व्याप:यांकडे किंवा खेडा खरेदीत कापूस विक्री केल्यास या लाभापासून शेतक:यांना वंचीत राहावे लागेल. त्यामुळे जास्तीत जास्त शेतक:यांनी बाजार समितीतच कापूस विक्री करावा. चांगल्या प्रतिच्या कापसाला चांगला भाव मिळणार आहे. शेतक:यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असेही आवाहन पवार यांनी यावेळी केले. प्रास्ताविकात सचिव योगेश अमृतकर यांनी खरेदी केंद्रासंदर्भात माहिती दिली.  गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 500 ते हजार रुपये जास्त भाव आहे.
 

Web Title: Cotton price of cotton at Rs 5,868

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.