मताधिक्य टिकविण्यासाठी भाजप तर वर्चस्वासाठी काँग्रेसची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:06 PM2019-04-18T12:06:57+5:302019-04-18T12:07:22+5:30

मनोज शेलार ।  नंदुरबार : गेल्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य देणा:या नंदुरबार विधानसभा मतदारसंघात यंदा मात्र मागील मताधिक्य ...

Congress is trying hard to save votes | मताधिक्य टिकविण्यासाठी भाजप तर वर्चस्वासाठी काँग्रेसची कसरत

मताधिक्य टिकविण्यासाठी भाजप तर वर्चस्वासाठी काँग्रेसची कसरत

Next

मनोज शेलार । 
नंदुरबार : गेल्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य देणा:या नंदुरबार विधानसभा मतदारसंघात यंदा मात्र मागील मताधिक्य टिकविण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागत आहे. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचा स्वत:चा मतदारसंघ असल्यामुळे ते या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची सेमीफाईनल खेळून घेणार आहेत. दरम्यान, आघाडीला मित्र पक्षांना साभाळतांना तर युतीला मित्रपक्षासह पक्षातीलच नाराजांना सांभाळतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
नंदुरबार विधानसभा मतदारसंघ हा आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचा हक्काचा मतदारसंघ आहे. पाच वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ.हिना गावीत यांना मिळालेल्या एकुण 1,06,905 एवढे मताधिक्यापैकी निम्मे अर्थात 50 हजार 55 एवढे मताधिक्य एकटय़ा नंदुरबार मतदारसंघातून होते. यंदा मात्र राजकीय समिकरणे बदलली आहेत. भाजपध्ये बंडखोरी झाली आहे. निष्ठावान आणि उपरे असा भेद होत असल्याची सल जुन्या भाजपाईंमध्ये आहे. गेल्या वर्ष, दिड वर्षात घडलेल्या काही घटनांमुळे काही समाज घटकांची उघड नाराजी आहे. मोदी लाट गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बरीच ओसरली आहे. मतदार संघातील काही नाराज मंडळींनी उघड बैठका घेतलेल्या आहेत. मित्र पक्ष शिवसेना देखील अपेक्षेप्रमाणे प्रचारात दिसून येत नाही. मंगळवारच्या बैठकीत बॅनरवरून काढता पाय घेतल्याचे उदाहरण ताजेच आहे. या सर्वाचा परिणाम होणार असल्यामुळे गेल्या निवडणुकीएवढे मताधिक्य टिकविण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 22 रोजी होणा:या सभेचा काय परिणाम होतो याकडे पक्षाचे लक्ष लागून आहे. 
दुसरीकडे काँग्रेसला देखील मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अधूनमधून काँग्रेसच्या पदाधिका:यांसोबत दिसून येतात, परंतु पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्यावरील निष्ठेमुळे त्यांच्या बाजुने कामाला लागले आहेत. भाजपमधील अंतर्गत बंडाळीचा फायदा मिळविण्यासाठी काँग्रेस प्रय}शील आहे. नगरपालिका, पंचायत समिती तसेच सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था या काँग्रेसच्या ताब्यात आहेत. आमदार रघुवंशी यांचे शिक्षण संस्थेचे जाळे मोठे आहे. त्याचा फायदा काँग्रेस घेण्यासाठी उत्सूक आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी हे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदारसंघात येणार असल्यामुळे पक्ष आणि उमेदवाराची आशा वाढली आहे. असे असले तरी पक्षातर्फे एकाही मोठय़ा किंवा दिग्गज नेत्याची सभा घेण्याचे नियोजन नसल्यामुळे त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. 
एकुणच नंदुरबार मतदारसंघातील स्थिती गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वेगळी आहे. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांना स्वत:च्या मतदारसंघातील प्रतिष्ठा टिकविण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. काँग्रेसलाही वाटते तितकी सोपी परिस्थिती नक्कीच नाही. स्थानिक पदाधिका:यांच्या बळावर अवलंबून न राहता उमेदवाराला मतदारांर्पयत पोहचावे लागणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कसे आणि किती राजकीय डावपेच टाकले जातात त्यावरच मतदार संघातील एकुण चित्र अवलंबून राहणार आहे. 
 

Web Title: Congress is trying hard to save votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.