चेडापाडा ग्रामस्थांची रेशनबाबत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:28 PM2019-07-21T12:28:44+5:302019-07-21T12:29:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  रेशनच्या धान्याची अफरातफर करणा:या बचत गटावर कारवाई करून त्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा, ...

Complaint about the ration of villagers of Chedapada | चेडापाडा ग्रामस्थांची रेशनबाबत तक्रार

चेडापाडा ग्रामस्थांची रेशनबाबत तक्रार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर :  रेशनच्या धान्याची अफरातफर करणा:या बचत गटावर कारवाई करून त्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील चेडापाडा ग्रामस्थांनी केली आहे.      
नायब तहसीलदार राजेंद्र नजन यांना चेडापाडा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, चेडापाडा गावातील लक्ष्मी महिला बचतगटास शासनाने शिधापत्रिका धारकांना रेशन वाटपासाठी नियुक्त केले आहे. मात्र या बचतगटाकडून शिधापत्रिका धारकांना शासनाने ठरविलेल्या मासिक मानकानुसार धान्य वेळेवर वाटप केले जात नाही. महिन्यातून फक्त एक ते तीन दिवसच धान्य वाटप करतात. तेथील फलकावर धान्य किती शिल्लक आहे व धान्य प्रति किलो काय दराने वाटप करावयास हवे याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती लिहिली जात नाही. नेहमी फलक कोराच असतो. त्यातच ज्या थोडय़ाफार लोकांना धान्य वितरीत होते त्यांना पावतीदेखील दिली जात नाही. 
गेल्या 10 वर्षात एकही नवीन शिधापत्रिका वितरीत करण्यात आलेली नाही. अश्या अनेक तक्रारी या बचतगटा विरुध्द असतांना 14 जुलै रोजी या बचगटाने रेशनचा शासकीय गहु, तांदुळ व इतर धान्य परस्पर विक्री व चोरटी वाहतूक करण्याच्या हेतुने खाजगी ट्रॅक्टर क्रमांक एमएच 39 - एच 0026 व ट्रॉली क्रमांक  एमएच 39 - एफ 8192 याव्दारे घेऊन जात असतांना गावक:यांनी पकडले असता ट्रॅक्टर पकडणा:या गावक:यांना तुम्हा सर्वाना बघून घेऊ अश्या धमक्या देण्यात आल्या. 
घटना घडली त्यावेळी पोलीस कर्मचारी सुध्दा हजर होते. रेशनच्या धान्याची अफरातफरच्या घटनेचा पुरावा म्हणून सर्व गावक:यांच्या समक्ष केलेल्या चित्रिकरणाची व्हिडिओफीत व फोटो सादर करण्यात आले       आहे. 
धान्याची अफरातफर करणा:या व गोरगरीबांच्या हक्काचा रेशन हडप करणा:या चेडापाडा गावातील लक्ष्मी महिला बचतगट व रेशनदुकानदाराचा कायमस्वरुपी परवाना रद्द करावा व संबंधित बचतगटातील सर्व सदस्यांवर कायमस्वरुपी बंदी लावण्यात यावी. जेणे करून हे सर्व सदस्य भविष्यात दुस:याच्या नावाने बचत गट तयार करू शकणार नाहीत व नवीन परवाना घेऊ शकणार नाहीत असे नमूद करून संबंधित बचतगटधारक  व रेशनदुकानदाराची चौकशी करून योग्य व कडक कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे निवेदनाद्वारे सुनीता रामदास वळवी, बेबी किशोर वळवी, मनीला अनिल वळवी, रुखा सुनील वळवी, मंगला जगदीश वळवी, सुनीता वळवी,  सुनीता जयराम भिल, सुना किशन वसावे, रेहाना भरत वळवी यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Complaint about the ration of villagers of Chedapada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.