रिक्षा चालकाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 09:09 PM2019-03-27T21:09:22+5:302019-03-27T21:09:44+5:30

विनापरवाना फलक: नंदुरबारातील घटना

 Code of Conduct violation of rickshaw driver | रिक्षा चालकाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा

रिक्षा चालकाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा

Next

नंदुरबार : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या आदर्श आचारसंहिता भंग प्रकरणी नंदुरबार शहरातील रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
रिक्षाचालक अनिल पुंजू चौधरी यांनी शिवाजी चौकात नगरपालिकेची परवानगी न घेता डिजीटल फलक लावल्याचे आचारसंहिता पथकाला दिसून आले होते़ दोन दिवसांपासून या फलकाची शहरात चर्चा होती़ पथकाने भेट देत रिक्षाचालक चौधरी याच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रिव्हेंशन आॅफ डिफेसमेंट आॅफ प्रापर्टी अ‍ॅक्ट, महाराष्ट्र नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम व भारतीय सार्वत्रिक लोकसभा निवडणूक आचरसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे़ गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हा फलक नंदुरबार पोलीसांनी जप्त केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे़

Web Title:  Code of Conduct violation of rickshaw driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.