शिवस्मारकासाठी समितीतर्फे धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:52 PM2019-07-22T12:52:02+5:302019-07-22T12:52:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील नियोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा निर्माणाचे काम कांदिवली मुंबई येथील शिल्पकार चंद्रजित ...

Checks by the committee for Shivsmara | शिवस्मारकासाठी समितीतर्फे धनादेश

शिवस्मारकासाठी समितीतर्फे धनादेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील नियोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा निर्माणाचे काम कांदिवली मुंबई येथील शिल्पकार चंद्रजित यादव करीत असून त्यांना रविवारी  येथील शिवस्मारक बहुउद्देशीय समितीतर्फे 21 लाख रुपयांचा धनादेश सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, जि.प. सदस्य अभिजीत पाटील व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, सामाजिक कार्यकर्ते  शाम जाधव यांच्या हस्ते देण्यात आला.
शहराच्या प्रवेशद्वाराजवळ शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची नागरिकांची होती. या पुतळ्याच्या निर्माणासाठी सर्वपक्षीय सदस्य, विविध सामाजिक संघटनांच्या सदस्यांची सर्वसमावेशक शिवस्मारक बहुउद्देशीय समितीची स्थापना करण्यात आली. यासाठी नगरपालिकेने शहरातील प्रवेशद्वारानजीक सुमारे 21 गुंठे जमीन दिली असून येत्या काही महिन्यात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. याठिकाणी समितीच्या वतीने अश्वारुढ  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा कसा असावा यासाठी समितीच्या सदस्यांनी गेल्या अनेक महिन्यात देशातील विविध ठिकाणी भेट देऊन माहिती   जाणून घेतली. नियोजित रेखाचित्र तयार करण्यात येऊन त्याचे नियोजन करण्यात आले व कांदिवली (मुंबई) येथील महाराष्ट्र शासनाचे कला संचालनालय समितीचे सदस्य चंद्रजित यादव यांना पुतळ्याच्या निर्मितीचे काम सोपविण्यात आले. सुमारे साडेतेरा फूट उंच अश्वारूढ पुतळा असणार असून या पुतळा परिसरात पालिकेच्या वतीने सुशोभीकरण करण्यात येणार आहे. रविवारी मुंबई येथे सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, शाम जाधव, समितीचे सदस्य अनिल  भामरे, किरण सोनवणे, शिवाजी पाटील, डॉ.किशोर पाटील, निलेश पाटील, मनोहर सैंदाणे, अॅड.सरजू चव्हाण, विजय पाटील, मच्छिंद्र पाटील, सागर मराठे, डॉ.दीपक मोरे, किशोर मोरे, प्रशांत मोरे, डॉ.गोकुळ  साळुंखे, शशिकांत पाटील, भूषण पाटील, शरद पाटील, शशिकांत  बेहरे, देविदास बोरसे यांच्यासह    माजी नगरसेवक विनोद चौधरी, नगरसेवक संदीप पाटील, नाना निकम, संजय साठे, संतोष वाल्हे, यशवंत चौधरी, मुकेश पवार, भूषण मोरे,  उमेश पाटील, हिरालाल रोकडे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. 
शिल्पकार चंद्रजित यादव यांच्यासोबत समितीच्या वतीने याबाबत करारनामा करण्यात आला. साडेतेरा फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळा निर्माणासाठी सुमारे 43 लाख रुपये खर्च अपेक्षित असून यापोटी 21 लाख रुपयांचा धनादेश यादव यांना सोपविण्यात आला. डिसेंबर 2019 अखेर पुतळ्याच्या निर्माणाचे काम पूर्ण होणार असून 19 फेब्रुवारी 2020 ला पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. पुतळा परिसरातील सुशोभीकरण व आकर्षक विद्युतीकरणाचे काम पालिका प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेतील सर्वपक्षीय सर्व नगरसेवकांनी ठराव करून मान्यता दिली आहे. शहरवासीयांसाठी अभिमानाची बाब असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा समितीच्यावतीने दिमाखदारपणे साजरा करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील दानशूर नागरिक व शिवभक्तांनी स्वयंस्फूर्तपणे आर्थिक मदत करावी, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Checks by the committee for Shivsmara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.