राज्यात तीन ठिकाणी मध्यवर्ती स्वयंपाक गृह सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:42 PM2018-10-21T12:42:42+5:302018-10-21T12:42:50+5:30

नंदुरबार आदिवासी प्रकल्पाचा समावेश : शासकीय आश्रम शाळांसाठी आदिवासी विकास विभागाची योजना

Central cooking halls will be started at three places in the state | राज्यात तीन ठिकाणी मध्यवर्ती स्वयंपाक गृह सुरू होणार

राज्यात तीन ठिकाणी मध्यवर्ती स्वयंपाक गृह सुरू होणार

Next

रमाकांत पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शासकीय आश्रमशाळेतील विद्याथ्र्याच्या पोषणाची स्थिती सुधारून त्यांना उच्च दर्जाचा परिपुर्ण आहार पुरवठा करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने नंदुरबार आदिवासी प्रकल्पासाठी घोडेगाव व जव्हार प्रकल्पासाठी मध्यवर्ती स्वयंपाक गृह सुरू करण्याला मान्यता दिली आहे. या कामासाठी 12 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शासकीय आश्रम शाळेतील भोजन व्यवस्था ही नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. निकृष्ट जेवनाचा आणि नाश्ता मिळत नसल्याचा अनेक ठिकाणच्या तक्रारी कायम आहेत. या पाश्र्वभुमीवर आश्रम शाळेतील विद्याथ्र्याना सर्वाना एकसारखा चांगल्या दर्जाचा आहार देण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाक गृहाचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून विचाराधीन होता. 
या पाश्र्वभुमीवर प्रायोगिक तत्वावर कांबळगाव व मुंडेगाव या दोन ठिकाणी टाटा ट्रस्टमार्फत तो सुरू करण्यात आला होता. तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता आदिवासी विकास विभागाने पुन्हा नंदुरबार प्रकल्पासह जव्हार व घोडेगाव या तीन ठिकाणी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 
या योजनेअंतर्गत प्रकल्प कार्यालयाच्या मुख्यालयी सुमारे दहा हजार विद्याथ्र्याचे जेवन एकाचवेळी शिजवता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी किचनशेड बांधणे, धान्य साठवण्यासाठी गोडावून, तेथील कर्मचा:यांसाठी स्टाफ रूम, शौचालये, सिलिंडर रूम, सुरक्षा रक्षक रूम, जनरेटरची व्यवस्था, स्वयंपाकासाठी लागणारे तांदूळ धुण्याचे मशीन, रवा मशीन, इडली सिस्टिम ग्राईंडर, यासह विविध सुविधा आदिवासी विकास विभागातर्फे पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी तिन्ही योजनांकरीता 12 कोटी रुपयांचा निधीला मंज़ुरी देण्यात आली आहे. त्यात नंदुरबार आणि घोडेगाव प्रकल्पासाठी प्रत्येकी तीन कोटी 84 लाख 60 हजार रुपये तर जव्हार प्रकल्पासाठी चार कोटी 30 लाख 80 हजार रुपये मंजुर करण्यात आले आहे.
हे मध्यवर्ती स्वयंपाक गृह स्त्री शक्ती संस्था व आदिवासी विकास विभागातर्फे चालविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शासनातर्फे आश्रमशाळेतील व वसतीगृहातील एका विद्याथ्र्याच्या दोन वेळच्या जेवनासाठी व दोन वेळच्या नाश्तासाठी प्रतीमाह दोन हजार 498 रुपये देण्यात येणार आहे. 
ही योजना राबविण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाक गृहाची उभारणी   व त्याचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली   सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे तर योजनेचे सनिंयंत्रण व मुल्यमापानासाठी आदिवासी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत विद्याथ्र्याना सकाळी साडेसात वाजता नाश्ता, सकाळी साडेदहाला मध्यान्ह जेवन, दुपारी साडेतीन वाजता अल्पोपहार व सायंकाळी साडेसहा वाजता रात्रीचे जेवन देण्यात येईल. मध्यवर्ती स्वयंपाक गृहाच्या ठिकाणी आदिवासी विकास विभागातर्फे दहा हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. 
संबधीत संस्थेतर्फे जेवन तयार करून ते प्रत्येक शासकीय आश्रम शाळेला वेळेवर पुरविण्यात येईल. त्याठिकाणी विद्याथ्र्याना वाटप करण्याचे काम संबधीत आश्रमशाळा व वसतीगृह कर्मचा:यांमार्फत करण्यात येणार आहे. 
 

Web Title: Central cooking halls will be started at three places in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.