चेक बाऊन्स करून पैसे उकळणा:यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:36 PM2019-07-21T12:36:21+5:302019-07-21T12:36:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : देना बँकेच्या शहादा शाखेच्या कर्मचा:यांसोबत संगनमत करून बँकेने खातेदाराला न दिलेला चेक बाऊन्स करून ...

Boiling money by checking bounce: Stuck it | चेक बाऊन्स करून पैसे उकळणा:यास अटक

चेक बाऊन्स करून पैसे उकळणा:यास अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : देना बँकेच्या शहादा शाखेच्या कर्मचा:यांसोबत संगनमत करून बँकेने खातेदाराला न दिलेला चेक बाऊन्स करून गैरमार्गाने पैसे उकळण्याचा प्रय} करणा:या मुख्य संशयित विजय अजरुन पाटील (रा.परिवर्धे, ता.शहादा ह.मु.नाशिक) यास पोलिसांनी अटक केली आहे. तीन वर्षापासून संबंधित संशयित हा पोलिसांच्या हाताला लागत नव्हता. त्याला न्यायालयात हजर केले असता 22 जुलैर्पयत न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस सूत्रानुसार, नगीन खुशाल पाटील रा.मनरद ता.शहादा यांचे देना  बँकेत खाते आहे. पाटील यांनी देना  बँकेकडून कुठलाही चेक घेतलेला नाही अथवा बँकेने त्यांना चेक बुक दिलेले  नसताना संशयित  विजय पाटील याने नगीन पाटील यांच्या नावाचा देना बँकेचा सुमारे चार लाख 90 हजार रुपये रकमेचा चेक नागीन पाटील यांच्या खात्यातून बाऊन्स केला. आपण बँकेकडून कुठलाही चेक घेतलेला नसताना  व कोणालाही चेक दिलेला नसताना एवढय़ा मोठय़ा रकमेचा चेक आपल्या खात्यातून बाऊन्स झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 9 जुलै 2016 रोजी शहादा पोलीस ठाण्यात विजय अजरुन पाटील व इतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नगीन पाटील यांनी शहादा पोलिसात दाखल केलेला गुन्हा व त्याची एफआयआर रद्द   व्हावी अशा मागणीच्या दोन रिट याचिका दाखल केल्या. औरंगाबाद खंडपीठाने दोन्ही याचिका फेटाळून लावल्यानंतर संशयित विजय पाटील याने शहादा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. या  प्रकरणातील संशयित विजय पाटील याने फिर्यादी नगीन पाटील यांच्याविरोधात नाशिक न्यायालयात धनादेशाचा अनादर केल्याची तक्रार नोंदविली होती. ही  तक्रार नाशिक न्यायालयाने फेटाळली आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य संशयित विजय पाटील याचा पोलीस शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना आढळून येत नव्हता. 17 जुलैला विजय पाटील हा नाशिकमध्ये असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर व पथकाने त्यास ताब्यात घेऊन अटक केली. 18 जुलैला त्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  शेंडगे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 22 जुलैर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 
याकामी सरकार  पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता सचिन पाटील यांनी तर फिर्यादी नगीन पाटील  यांच्यातर्फे अॅड.प्रितेशकुमार जैन यांनी काम पाहिले.

Web Title: Boiling money by checking bounce: Stuck it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.