अबब..नंदुरबारात केवळ एक रुपयात 17 जोडप्यांचे झाले शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:23 PM2017-12-17T13:23:22+5:302017-12-17T13:23:29+5:30

Aub .. Shubhamangal has just 17 pairs in Nandurbar | अबब..नंदुरबारात केवळ एक रुपयात 17 जोडप्यांचे झाले शुभमंगल

अबब..नंदुरबारात केवळ एक रुपयात 17 जोडप्यांचे झाले शुभमंगल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नदुरबार : जिल्हा नाभिक समाज हितवर्धक संस्थेतर्फे शनिवारी येथे झालेल्या तिस:या सामुदायिक विवाह सोहळयात समाजातील          17 जोडप्यांचा विवाह लावण्यात  आला. विशेष म्हणजे केवळ एक रुपयांच्या नोंदणी शुल्काची आकारणी करुन हा विवाह सोहळा संपन्न झाला़
शहरातील यशवंत विद्यालयाच्या पटांगनावर आयोजित      या कार्यक्रमास आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, उद्योगपती मनोज रघुवंशी, किशोरभाई वाणी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, राजेंद्र मंडलिक, विश्वास मराठे, डॉ.गिरीश ईशी, डॉ.सिध्देश जाधव, लोटन शिरसाठ, जि.प.सदस्य पुष्पाबाई सैंदाणे, भागवतकार नंदकिशोर शर्मा, अरविंद सैदाणे, पी.टी.सोनवणे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, सचिव शामराव ईशी, महिला जिल्हाध्यक्षा ताराबाई हिरे, सचिव सरलाबाई हिरे, उपाध्यक्ष दिलीप बोरसे, सुरेश सैदाणे, सजंय बोरसे, रविद्र वरसाळे, हरचंद सोनवणे, कथ्थूराम सैंदाणे, किशोर हिरे, माजी नगरसेवक किशोर सोनवणे, धनराज वरसाळे, सुनील वरसाळे आदी उपस्थित होते.
सुरवातीला समाजातील गुणवंतांना समाजर}, समाज भुषण पुरस्कार व शहर युवा मंच सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या विवाह सोहळयसाठी वधु-वरांकडून नाममात्र 1 रूपया घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. अन्नदानासाठी आत्माराम सोनवणे, रविंद्र मंडलिक, विनायक ठाकरे, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रशांत बोरसे यांनी देणगी दिली. वरांसाठी सफारी ड्रेस किशोर सोनवणे, वधुसाठी महावस्त्र दिलीप बोरसे, वधु-वरांसाठी बुट-चप्पल रविंद्र वरसाळे, हार-गुच्छ आधार पवार, जलसेवा दिपक शिंदे, फोटो व व्हिडीओ शुटींग खापरच्या दिपकला, मधुरम व मयुर फोटो स्टुडिओ यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी आमदार रघुवंशी यांनी समाजातील सामुदायिक सोहळयासाठी एवढय़ा मोठया संख्येने समाजबांधव उपस्थित असल्याचे पाहुन समाजाप्रती सर्वाची बाधिलकी असल्याचे दिसून येते. समाजाला मदत करण्याची भूमिका सर्वानी ठेवावी, समाज एकत्र राहिल्यास त्याची        प्रगती होत असल्याचेही त्यांनी सांगितले. सुत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले.
 

Web Title: Aub .. Shubhamangal has just 17 pairs in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.