नंदुरबारात रब्बीचे क्षेत्र यंदा निम्मेने घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:43 PM2018-11-16T12:43:38+5:302018-11-16T12:43:42+5:30

गहू, हरभरा क्षेत्रालाही फटका : कुपनलिका, विहिरी अटल्या, सिंचन प्रकल्पांमध्ये ठणठणाट

The area of ​​Rabbi in Nandurbar will be reduced by half | नंदुरबारात रब्बीचे क्षेत्र यंदा निम्मेने घटणार

नंदुरबारात रब्बीचे क्षेत्र यंदा निम्मेने घटणार

Next

नंदुरबार : : पाण्याची टंचाई व दुष्काळसदृष्य स्थिती यामुळे जिल्ह्यात यंदा रब्बीची पेरणी निम्म्यावर येणार आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात सर्वाधिक गहू आणि हरभराची पेरणी केली जाते. या दोघांचे क्षेत्र देखील यंदा मोठय़ा प्रमाणावर घटणार आहे. जिल्ह्यात रब्बी व उन्हाळी पिकांचे क्षेत्र जवळपास आठशे हेक्टरच्या आसपास आहे. दरम्यान, सिंचन प्रकल्पात आतापासूनच ठणठणाट असल्यामुळे रब्बीसाठी आवर्तने यंदा सुटणार नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाम हातचा गेला आहे. सरासरीचा केवळ 67 टक्के पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची उत्पादकता निम्म्यावर   आली होती. अनेक पिके पावसाअभावी वाया गेली होती. यामुळेच शासनाने जिल्ह्यातील सर्वच खरीप आणि रब्बी गावाची पैसेवारी 50 पैशांच्या आत जाहीर करण्यात आली आहे. 
खरीप प्रमाणेच आता रब्बीचाही हंगाम जेमतेमच राहणार असल्याचे चित्र आहे. सद्य स्थितीत रब्बीची पेरणी आठ ते नऊ टक्केंवर झाली आहे. येत्या काळात थंडीची तीव्रता वाढणार असल्यामुळे आताच पेरणीसाठी योग्य काळ         असल्याचे कृषी विभागाचे म्हणने आहे.
गहूचे क्षेत्र सर्वाधिक
जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहूचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्या खालोखाल हरभराचे क्षेत्र असून ज्वारीही मोठय़ा प्रमाणावर पेरली जाते. जिल्हतील एकुण रब्बीचे क्षेत्र लक्षात घेता बागायतदार शेतकरीच सर्वाधिक रब्बीची पेरणी करतात. एकुण आठशे हेक्टर क्षेत्र असून त्यात गहूचे 217.62 हेक्टर, ज्वारीचे 241.8 हेक्टर, मकाचे 15.79 हेक्टर, हरभराचे 201.53 हेक्टर, करडई 3.98, सूर्यफूल 6.14, इतर तृणधान्य 3.2, इतर कडधान्य 3.62, इतर गळीतधान्य 20.9 हेक्टर असे एकुण रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे. याशिवाय उन्हाळी हंगामाचे 81.6 हेक्टर क्षेत्र आहे. त्यात भुईमूग 73.8, सूर्यफूल 2.2, मका 5.6 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
निम्मे क्षेत्र घटणार
यंदा रब्बीचे क्षेत्र निम्मे घटणार आहे. गेल्यावर्षी पजर्न्यमान चांगले असल्यामुळे रब्बीचे क्षेत्र 100 टक्केपेक्षा अधीक झाले होते. त्यात गहूचे क्षेत्र सर्वाधिक झाले होते. यंदा मात्र, पाऊसच नसल्यामुळे आणि विहिरी, कुपनलिका यांची पाणीपातळी खोल गेल्याने पेरणी निम्मे क्षेत्रात होणार नाही.
याशिवाय लघु व मध्यम सिंचन प्रकल्पात देखील ठणठणाट असल्यामुळे रब्बीसाठी पाण्याचे अवर्तने सुटण्याचा प्रश्नच राहणार नाही. त्यामुळे शेतक:यांच्या हातून यंदा रब्बी हंगाम देखील निसटला आहे.
चा:याची चणचण भासणार
खरीप वाया गेला, आता रब्बीही येणार नसल्यामुळे या पिकांपासून मिळणारा चाराच यंदा उपलब्ध होणार नसल्यामुळे शेतक:यांपुढे मोठी बिकट परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात शेतक:यांना चा:यासाठी शोधाशोध करावी लागणार आहे. उन्हाळ्याच्या चार महिन्यांसाठी शेतक:यांना रब्बी पिकांपासून मिळणारा चारा उपयोगी पडतो. 
खरीप पिकांचा चारा मार्च, एप्रिलर्पयत टिकत असतो. यंदा हे चक्रच बिघडणार असल्यामुळे शेतक:यांचे अर्थकारण विस्कटणार आहे.
 

Web Title: The area of ​​Rabbi in Nandurbar will be reduced by half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.