जलयुक्तअंतर्गत यंदा 104 गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:40 PM2017-09-25T12:40:23+5:302017-09-25T12:40:23+5:30

नोडल अधिकारी नियुक्त : लोकसहभागावर सर्वाधिक जोर, गाळमुक्त धरणाला प्राधान्य

104 villages under hydraulic area | जलयुक्तअंतर्गत यंदा 104 गावे

जलयुक्तअंतर्गत यंदा 104 गावे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आगामी वर्षासाठी जिल्ह्यातील 104 गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. यंदा करण्यात येणा:या कामांमध्ये लोकसहभागाला सर्वाधीक महत्त्व देण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक मशिनरींचा वापर करून त्याचा मोबदलाही दिला जाणार  आहे. त्यामुळे लोकसहभाग वाढणार आहे.
जलयुक्त शिवार योजनेच्या कामांच्या आढावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. डॉ.एम.कलशेट्टी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. आतार्पयत जिल्ह्यात 141 गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले आहे. यंदा 104 गावांची जलयुक्तसाठी निवड करण्यात आली आहे. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, यंदा गावांची निवड ही शासनाच्या निकषाप्रमाणे केलेली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समितीने निकष ठरवून गावे निवडली आहेत. ज्या गावांची निवड करण्यात आली त्या गावातील किमान पाच गावक:यांची अर्थात सरपंच, उपसरपंच, प्रगतशील शेतकरी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांचे तीन दिवसांचे प्रशिक्षण पुर्ण करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे इतर गावक:यांचे एक दिवसांचे प्रशिक्षण हे आदर्श गाव समितीचे निमंत्रक पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. त्यात पालकमंत्र्यांसह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. आता पुर्ण नियोजनानुसार जलयुक्तची कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी लोकसहभाग हा महत्त्वाचा ठरणार आहे. 
27 रुपये घनमिटर..
नाला खोलीकरण काम हे लोकसहभागातून करण्यात येईल. त्यासाठी 27 रुपये प्रती घनमिटर हा दर निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी गावातील मशिनरींचा पुरेपुर वापर करण्यात येईल. याशिवाय लोकसहभागातून गाळ काढणे, कंपार्टमेंट बंडींग हे कामे देखील करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
निवडलेल्या 104 गावांसाठी नोडल अधिका:यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सदर नोडल अधिकारी हे गावांची शिवार फेरी काढणे, आराखडा तयार करणे, अंमलबजावणी करणे या कामांकडे लक्ष देतील.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी, सामाजिक वनिकरणाचे रामकिसन जेजूरकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश शिंदे  यांच्यासह सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. 
जलयुक्त शिवार अभियानाचे यंदा तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी 72 गावांची निवड करण्यात आली होती. दुस:या वर्षी 69 गावांची निवड झाली होती. आता तिस:या वर्षी लोकप्रतिनिधींचा सहभाग घेवून, समिती नेमून गावांची निवड करण्यात आली. त्यात 104 गावांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या वर्षाच्या तुलनेत दुस:या वर्षी कामाची गती जास्त होती. शिवाय लोकसहभाग देखील मोठय़ा प्रमाणावर घेण्यात आला होता. त्यामुळे वेळेत कामे पुर्ण करण्यात यश आले. यंदा देखील गेल्यावर्षाप्रमाणे नियोजन राहील अशी अपेक्षा आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी स्वत: विविध बाबींचे नियोजन करीत आहेत.

Web Title: 104 villages under hydraulic area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.