डोक्यात दगडाने वार करून महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:38 AM2019-02-24T00:38:51+5:302019-02-24T00:39:33+5:30

शहराच्या पूर्व दिशेला भूमीअभिलेख कार्यालयाच्या बाजूला असलेल्या बेल्लोरीच्या एका छोट्या नाल्याच्या काठावर ३० वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी उघड झाली़

The woman's murder by stoning the head | डोक्यात दगडाने वार करून महिलेचा खून

डोक्यात दगडाने वार करून महिलेचा खून

googlenewsNext

किनवट : शहराच्या पूर्व दिशेला भूमीअभिलेख कार्यालयाच्या बाजूला असलेल्या बेल्लोरीच्या एका छोट्या नाल्याच्या काठावर ३० वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी उघड झाली़ मयतावर बलात्कार करून खून झाला असावा असा संशय आहे. मयताच्या उजव्या हातावर मुक्ता इंगळे असे नाव गोंदलेले असल्याने तिची ओळख पटविण्यास मदत झाली.
मयत महिला ही माळबोरगाव येथील असून तिचे सासर विदर्भातील पुसद तालुक्यातील लोणधरी येथील आहे. गतवर्षी तिच्या पतीचे निधन झाले.
मयत मुक्ता इंगळे हिला दोन मुली असून ती माहेरी माळबोरगाव येथे राहत होती़ एक मुलगी दुसऱ्या वर्गात तर दुसरी मुलगी सहा वर्षांची आहे़ मांडवा (किनवट) येथील अनुदानित आश्रमशाळेत दुसºया वर्गात शिकणाºया आपल्या मुलीला सोडण्यासाठी ती २२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते चारचे दरम्यान आली होती़ त्यानंतर ती परत गेली़ ती एका दुचाकीवर आली होती, असे शिक्षक व पोलिसांचे म्हणणे आहे़ हा खून अनैतिक संबंधातून २२ फेब्रुवारीच्या रात्री झाल्याचा पोलिसांचा संशय आहे़
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप तिडके, पीएसआय मलय्या स्वामी, अनिल कांबळे, गणेश चिते, पोहेकॉ पांढरे, पोकॉ गणेश केजकर, शिवाजी चुनमवार, किशोर मेश्राम, मधुकर पांचाळ, नारायण संदूपटलावार यांनी व महिला पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला़ मयताच्या डोक्यावर दगड घालून खून केला़ घटनास्थळी पर्स व कंडोम मिळून आले़ त्यामुळे बलात्कार करून खून झाला असावा, अशी चर्चा आहे़
ज्या ठिकाणी खून झाला त्या परिसरात जिकडेतिकडे दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्या़ मारेकºयाच्या शोधासाठी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक तिडके यांनी दिली़
पत्नी पळून गेल्याचा मानसिक धक्का बसल्याने दोन अपत्यांना समोसा व पेढ्यात विष टाकून जिवे मारल्यानंतर स्वत:ही तिथेच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी किनवट तालुक्यातील वडोली जंगलात उघड झाली़ हे प्रकरण ताजे असताना आज २३ फेब्रुवारी रोजी खुनाची घटना उघड झाली.

Web Title: The woman's murder by stoning the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.