किनवटकरांना उमेदवारांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:50 AM2019-03-23T00:50:35+5:302019-03-23T00:50:53+5:30

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून प्रत्यक्ष नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना शिवसेनेसह वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली असून, आता काँग्रेस कोणाला मैदानात उतरविते.

Waiting for the Kinnatkar candidates | किनवटकरांना उमेदवारांची प्रतीक्षा

किनवटकरांना उमेदवारांची प्रतीक्षा

Next

किनवट : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून प्रत्यक्ष नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना शिवसेनेसह वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली असून, आता काँग्रेस कोणाला मैदानात उतरविते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच हिंगोली लोकसभेत यंदा चुरशीचा तिरंगी सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
किनवटचा मतदार हा जागरूक आहे. हे आजपर्यंतच्या निवडणुकीवरून दिसून आले आहे़ किनवट नगरपरिषद व पंचायत समितीची सत्ता भाजपकडे आहे. तर माहूर नगरपरिषद व एकूण आठ जि़प़पैकी सहा सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. त्यात नांदेड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव हे याच माहूर तालुक्यातील आहेत़ लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन येत्या विधानसभेचे गणित बांधले जाणार असल्याने आ़ प्रदीप नाईक प्रचारात चांगलेच सक्रिय होतील. दुसरीकडे सेना- भाजपाही आपली ताकद आजमावणार असून, वंचित बहुजन आघाडीनेही चांगलीच कंबर कसल्याचे चित्र आहे़ मागच्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने असणाऱ्या माजी आ़ भीमराव केराम यांची भूमिका या लोकसभा निवडणुकीत काय असणार यावरही बरेच काही अवलंबून आहे़ भाजप- सेनेत असलेली गटबाजी लोकसभा निवडणुकीत राहील की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल़

  1. हिंगोली लोकसभा मतदारसंघात किनवट विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून १ लाख ३२ हजार ९४५ पुरुष व १ लाख २४ हजार ५९१ स्त्री व इतर ०८ असे एकूण २ लाख ५७ हजार ५४४ मतदार आहेत़ मोदी लाटेच्या विरोधात ज्या दोन जागा जिंकल्या त्यात नांदेड आणि हिंगोलीचा समावेश होता. मागील निवडणुकीत विद्यमान खा़अ‍ॅड़राजीव सातव यांना किनवटमधून आ़प्रदीप नाईक व आदिवासी नेते माजी आ़भीमराव केराम यांनी चांगले सहकार्य केल्याने ते विजयी झाले होते. आपल्या मतदारसंघाचा खासदारास लागोपाठ उत्कृष्ट संसदपट्टू म्हणून बहुमान मिळतो. याचा अभिमान मतदारांत दिसून येतो. गावचौकातल्या बैठकीतही याबाबतची चर्चा होताना दिसते. मात्र, अद्यापपर्यंतही काँग्रेस आघाडी व युतीचा उमेदवार स्पष्ट झालेला नसल्याने कार्यकर्ते द्विधा मन:स्थितीत तर मतदार संभ्रमात आहे़

Web Title: Waiting for the Kinnatkar candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.