निवडणुकीत अत्याधुनिक सुविधांचा वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:59 AM2019-02-10T00:59:42+5:302019-02-10T01:01:11+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला असून प्रत्येक निवडणूक ही मतदानासाठी अत्याधुनिक सुविधा घेवून येत आहे. या अत्याधुनिक सुविधांचा वापर करताना शासकीय यंत्रणांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.

Use the latest facilities in the elections | निवडणुकीत अत्याधुनिक सुविधांचा वापर करा

निवडणुकीत अत्याधुनिक सुविधांचा वापर करा

Next
ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकतयारी लोकसभेची

नांदेड : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला असून प्रत्येक निवडणूक ही मतदानासाठी अत्याधुनिक सुविधा घेवून येत आहे. या अत्याधुनिक सुविधांचा वापर करताना शासकीय यंत्रणांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेण्यात आला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक फतेसिंह पाटील, पोलीस अधीक्षक संजय जाधव, महापालिका आयुक्त लहुराज माळी, सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेसी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी दीपाली मोतीयाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते.
या काळात आयोगाने दिलेल्या निर्देशांचे योग्य पालन करुन निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, भयमुक्त व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येवून प्रयत्न करणे आवश्यक आहे. या निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम मशीनसोबतच आता पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार आहे.
मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्यात येणा-या स्ट्राँग रुपची दुरुस्ती बांधकाम विभागाकडून करुन त्याबाबत प्रमाणपत्र घ्यावे. मागील निवडणुकांचा अभ्यास करुन येत्या लोकसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक जाधव यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती दिली.
गुन्हेगारीवृत्ती असलेल्या लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवून कारवाई करावी, शस्त्र परवानाधारकांनीही नियमांचे पालन करावे. त्याचवेळी पोलीस यंत्रणेने आपआपल्या हाती कोणतेही अवैध प्रकार चालणार नाहीत, याकडे आतापासूनच लक्ष द्यावे, अशी सूचना केली, आतापासून काळजी घेतली तरच निवडणूक काळात शांतता राखता येईल, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी मोतियाळे यांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध कामाबाबत माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर व मुखेड या नऊ विधानसभा मतदारसंघातील व्यवस्थेबाबत संंबंधित उपविभागीय अधिकाºयांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी महसूल व पोलीस यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक काळात निवडणूक आयोग आपला बॉस
निवडणूक काळात पोलिसांनी व महसूल यंत्रणेने नि:पक्षपाती भूमिका ठेवून पारदर्शक काम करणे आवश्यक आहे. या काळात प्रशासन हे लोकांसाठी आहे हे जनतेला पटवून द्यावे लागणार आहे. निवडणूक काळात निवडणूक आयोगा आपला बॉस असतो. कोणताही लीडर आपला बॉस नाही, हे लक्षात ठेवावे, असे विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या सूचना निवडणूक प्रक्रियेतील शेवटच्या घटकातील व्यक्तीला समजावेत, यासाठी आयोगाच्या सूचना मराठीत द्याव्यात, अशी सूचनाही फत्तेसिंह पाटील यांनी केली.

Web Title: Use the latest facilities in the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.