जमावाच्या तावडीतून आरोपीला काढले बाहेर; विनयभंग करणाऱ्याला चांगलेच बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2024 08:01 PM2024-01-18T20:01:22+5:302024-01-18T20:01:44+5:30

त्या प्रकरणातील आरोपी समजून केली मारहाण

The accused was pulled out from the clutches of the mob; Well done to the molester | जमावाच्या तावडीतून आरोपीला काढले बाहेर; विनयभंग करणाऱ्याला चांगलेच बदडले

जमावाच्या तावडीतून आरोपीला काढले बाहेर; विनयभंग करणाऱ्याला चांगलेच बदडले

नांदेड -  रोही पिंपळगाव येथील घटना ताजीच असताना एका शालेय विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या युवकाला जमावाने बेदम चोप दिला. त्या प्रकरणातील हा आरोपी असल्याचे समजून जमाव वाढत गेला. परंतु, वेळेत पोलीस पोहोचल्याने सदर आरोपीची जमावाच्या तावडीतून सुटका करण्यात आली.

सदर युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुदखेड पोलिस करत आहे. मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील एका शालेय विद्यार्थीनीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेला चार दिवस लोटत नाहीत, तोच याच परिसरातील एका शालेय विद्यार्थीनीचा हात पकडून तिची छेड काढण्याचा प्रयत्न एका भंगार वेचणाऱ्या युवकाने केला. मुलीने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी सदर आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला.

Web Title: The accused was pulled out from the clutches of the mob; Well done to the molester

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.