मद्यासाठी आॅईलच्या टँकरमधून मळीची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:10 AM2018-05-27T01:10:27+5:302018-05-27T01:10:27+5:30

इंडियन आॅईल कंपनीच्या टँकरमधून मळीची वाहतूक होत असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नांदेड विभागाने उघडकीस आणला़ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड ते अहमदपूर रोडवरील इसाद येथे हा ट्रक ताब्यात घेण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे़ दारु तयार करण्यासाठी या मळीचा वापर करण्यात येतो़

Slurry from the oil tanker for the alcohol | मद्यासाठी आॅईलच्या टँकरमधून मळीची वाहतूक

मद्यासाठी आॅईलच्या टँकरमधून मळीची वाहतूक

Next
ठळक मुद्देराज्य उत्पादनची कारवाई : त्रिधारा शुगरचा उपद्व्याप

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : इंडियन आॅईल कंपनीच्या टँकरमधून मळीची वाहतूक होत असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नांदेड विभागाने उघडकीस आणला़ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड ते अहमदपूर रोडवरील इसाद येथे हा ट्रक ताब्यात घेण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे़ दारु तयार करण्यासाठी या मळीचा वापर करण्यात येतो़
परभणी जिल्ह्यातील आमडापूर येथील त्रिधारा साखर कारखान्यामधून अवैधरीत्या हातभट्टी निर्मितीसाठी मळीची वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती राज्य नीलेश सांगडे यांना मिळाली होती़
त्यानंतर निरीक्षक एस़एस ख़ंडेराय, पी़ए़ मुळे, डी़एऩ चिलवंतकर, आनंद कांबळे, एस़एम़ बोदमवाड, रफत कोतवाल, दुय्यम निरीक्षक ठाकूर, चाळनेवाड, घुगे, मानेरे, अनकाडे, नंदगावे, राठोड, स्वामी, शेख, पवार यांच्या पथकाने गंगाखेड-अहमदपूर रस्त्यावर इसाद शिवारात इंडियन आॅईल कंपनीच्या (एम़एच़०४- डीडी १४७४) या टँकरला अडविले़
यावेळी पथकाने टँकरची तपासणी केली असता, त्यात २० ते २२ मेट्रीक टन मळी असल्याचे आढळून आले़
उत्पादन शुल्कच्या पथकाने टँकरचालक दत्तात्रय लक्ष्मण मुळे व लक्ष्मण विलास खटके या दोघांना विचारपूस केली़
त्यावेळी इंडियन आॅईल कंपनीचे बनावट बोधचिन्ह लावून अवैधरीत्या मळीची वाहतूक करण्यात येत असल्याची कबुली त्यांनी दिली़ तसेच सदरील टँकर हा त्रिधारा शुगर लि़ (आमडापूर जि़परभणी) येथून भरला असून तो सोलापूर जिल्ह्यातील मुळेगाव तांडा येथे हातभट्टी निर्मिती केंद्रावर जात असल्याचे त्यांनी सांगितले़
त्यानंतर अधीक्षक निलेश सांगडे यांनी त्रिधारा शुगरची तपासणी केली़ यावेळी नोंदवहीत काहीच आढळून आले नाही़ तसेच गाळपामध्येही विसंगती असल्याचे दिसून आले़ त्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती़

नोंदवहीत विसंगती आढळल्याने गुन्हा दाखल
अधीक्षक निलेश सांगडे यांनी त्रिधारा शुगरची तपासणी केली़ यावेळी नोंदवहीत काहीच आढळून आले नाही़ तसेच गाळपामध्येही विसंगती असल्याचे दिसून आले़ त्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती़

Web Title: Slurry from the oil tanker for the alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.