नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात औषधींचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:37 AM2018-08-31T00:37:32+5:302018-08-31T00:38:22+5:30

भोकर, हिमायतनगर, कंधार, माहूर : येथील ग्रामीण रुग्णालयात मागील अनेक दिवसापासून औषधींचा तुटवाडा निर्माण झाला. औषधी मिळत नसल्याने रुग्णांना बाजारातून औषधी खरेदी करावी लागत आहेत. अनेक रुग्ण ग्रामीण रुग्णालयात न येता खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने प्रचंड आर्थिक ताण अशा कुटुंबावर पडत आहे.

Scarcity of medicines in rural hospital in Nanded | नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात औषधींचा तुटवडा

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात औषधींचा तुटवडा

googlenewsNext
ठळक मुद्देभोकर, कंधार, माहूर, हिमायतनगरातील रुग्ण बेजार

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर, हिमायतनगर, कंधार, माहूर : येथील ग्रामीण रुग्णालयात मागील अनेक दिवसापासून औषधींचा तुटवाडा निर्माण झाला. औषधी मिळत नसल्याने रुग्णांना बाजारातून औषधी खरेदी करावी लागत आहेत. अनेक रुग्ण ग्रामीण रुग्णालयात न येता खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने प्रचंड आर्थिक ताण अशा कुटुंबावर पडत आहे.
हिमायतनगरातील खाजगी रुग्णालयात गर्दी
हिमायतनगर : तालुक्यात ५२ ग्रामपंचायतीदरम्यान ६२ गावे असून आरोग्याच्या दृष्टीने शहरात ग्रामीण रुग्णालय सरसम, चिंचोर्डी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे़ सध्या पावसाळा सुरु असल्याने विहीर, बोरमध्ये नवीन पाणी जमा झाले़ त्यामुळे क्षाराचे प्रमाण वाढले़ त्यामुळे लहान मुलापासून मोठ्या नागरिकांत ताप, सर्दी, खोकला आदी रोग्यांचे प्रमाण वाढले असल्याने सरकारी, खाजगी दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे़ हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात नागरिकांचे सर्दी, ताप, खोकला तर लहान मुलांचे सर्दी, ताप, खोकल्यावरील कोणत्याच प्रकारचे औषध उपलब्ध नसल्याने पालक वर्ग व नातेवाईक दवाखान्यात रोजच वाद घालत आहेत. डॉक्टरची टीम उपस्थित असूनही अनेक प्रकारचे औषधी गेली सहा महिन्यापासून नसल्याने हतबल झाले़


गेल्या सहा ते आठ महिन्यापासून सर्वच औषधांचा तुटवडा आहे़ अनेक वेळा औषंधाची मागणी करुनही पूर्तता होत नाही़ रुग्णाचे नातेवाईक रोज वाद घालतात़ त्यामुळे औषधी उपलब्ध नसल्याने आमची टीम हतबल झाली
- डॉ. भुरके, वैद्यकीय अधिकावी, ग्रामीण रुग्णालय, हिमायतनगर


गरीब रुग्णांची कोळीत कोंडी
निवघा बाजार : मौजे कोळी ता़ हदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधींचा तुटवडा आहे. गरिबांना खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात़ तर कोळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ९ आरोग्य उपकेंद्र असून या उपकेंद्रात मोठ्या प्रमाणावर आरोग्य कर्मचाऱ्यांचे रिक्त पद असल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला. प्रत्येक आरोग्य उपकेंद्रात परिचारिका, कंत्राटी परिचारिका व आरोग्य सेवक असे तीन पद असतात़ परंतु बहुतांश आरोग्य उपकेंद्र एकाच कर्मचा-यावर चालत असल्याने कार्यरत कर्मचा-यावर अतिरिक्त ताण येत आहे़ आरोग्य उपकेंद्रात प्रसुतीची व्यवस्था नसल्याने थेट उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे प्रसुतीकरिता पाठवतात़ तर उपजिल्हा रुग्णालयातही प्रसुती रुग्णास काहीच सुविधा मिळत नसल्याने रुग्ण व नातेवाईक त्रस्त आहेत़

भोकर ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक औषधींचा तुटवडा
भोकर : शहरातील ग्रामीण रुग्णालयात आवश्यक असणा-या औषधींचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
रुग्णांच्या सोयीसाठी असलेल्या शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये सध्या अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अत्यावश्यक सेवेची गरज असलेल्या रुग्ण, नातेवाईकांना बाहेरून औषधी घेण्याची वेळ आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत लागणारी औषधे अंटीबायटीक, ओआरएस आणि अंटीबायटीक इंजेक्शन्सचा तुटवडा निर्माण झाला.


दोन दिवसात औषधी पुरवठा होणार
दोन दिवसापूर्वी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निमार्ण झाल्याबाबत चर्चा करण्यात आली असून संबंधित फार्मासिस्टकडे औषधांची मागणी केली आहे. त्यानुसार दोन दिवसात आवश्यक औषधींचा पुरवठा होईल -डॉ. अशोक मुंडे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर.



कंधार ग्रामीण रुग्णालयात जीवाणू प्रतिबंधक औषधींचा तुटवडा
कंधार : शहरातील ग्रामीण रुग्णालयावर रुग्ण उपचाराचा मोठा ताण आहे़ परंतु रुग्णालयात खोकला, संडास, ताप, मलेरिया, विषमज्वर आदी रोगाची औषधींची वाणवा आहे़ जीवाणू प्रतिबंधक औषधींचा प्रचंड तुटवडा असल्याने रुग्णांची उपचारासाठी मोठी फरफट असल्याची विदारक स्थिती आहे़  रुग्णालयात प्रतिदिन २५० ते ३०० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी दाखल होतात़ सोमवारी ३५० ते ४०० रुग्ण संख्या असते़ परंतु ताप, खोकला, संडास, मलेरिया, विषमज्वर आदी रुग्णांची औषधीची मोठी वाणवा प्रकर्षाने असते़ मेट्रोजील, फ्यूरॉक झोन, पॅरासिटामॉल, लॅरीयामो, झेपी २००, क्लैवम आदी गोळ्या व सायरपची वाणवा आहे़ तसेच प्रतिजैवके-जीवाणू प्रतिबंधक औषधींचा प्रचंड तुटवडा असल्याने रुग्णांना खाजगी औषधी दुकानात जावून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो़


रुग्णालयात संडास, खोकला, सलाईन आदींचा पुरवठा कमी होता़ आता गुरुवारी साठा उपलब्ध झाला असलयाने रुग्णांना याचा फायदा होणार आहे़ परंतु औषधी तुटवडा असे म्हणता येत नाही़ रुग्णसंख्या व उपचार यावरून औषधी सतत मागणी केली जाते - बी़एल़ शेळके, औषध निर्माण अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, कंधाऱ



माहुरातील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था गंभीर
श्रीक्षेत्र माहूर : भाविकांसह शहरी ग्रामीण भागातील रुग्ण उपचाराकरिता येतात़ परंतु माहूर ग्रामीण रुग्णालयाची अवस्था फार गंभीर झाली. ग्रामीण रुग्णालयात मागील महिन्यापासून सर्दी, खोकला, ताप अशा साथीच्या आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढली. मात्र औषधींचा थांगपत्ता नाही. हे चित्र मागील तीन ते चार महिन्यापासून कायम आहे़ रुग्णालयात येणाºया रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाणही अधिक आहे़ औषधांची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली जाते़ परंतु संबंधित औषधे उपलब्ध होत नाहीत, असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले़ येथील एक्स रे मशीनमध्ये तांत्रिक बिघाडमुळे एक्स रे व्यवस्थित निघत नसून सोनोग्राफी मशीनची सुविधा नसल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना विशेषत: महिलांना ४० ते ५० कि़मी़चा प्रवास करून सुविधा मिळवावी लागत आहे़ रिक्त पदे: सहाय्यक अधीक्षक १, कनिष्ठ लिपिक १, औषध निर्माण अधिकारी १ ही पदे मागील अनेक महिन्यापासून रिक्त आहेत़ त्यामुळे इतर कर्मचाºयांवर कामाचा ताण पडत आहे़

नोंदणी शुल्क दहा रुपये तर औषधी पाच रुपयांची
रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांना १० रुपये शुल्क भरणा करावा लागतो़ त्यानंतर औषधी पाच रुपये किंमतीची दिली जाते़ रक्त, लघवी, एक्सरेसाठीचे शुल्क तर यापेक्षा जास्त असते़ परंतु दिलेल्या रकमेएवढेही (किंमतीचे) औषध मिळत नसल्याच्या तक्रारी रुग्णातून केल्या जात आहेत़ एवढा औषधी तुटवडा असल्याचे चित्र आहे़

औषधी साठाच उपलब्ध नसल्याने उपचार कुचकामी
बारड : येथील सरकारी ग्रामीण रूग्णालय परिसरातील जनतेला रुग्णसेवेसाठी वरदान ठरले असून गरीब रुग्णाची रुग्णसेवेसाठी होणारी लूट यापासून बचाव मिळाला असून अल्प खर्चात उपचार मिळत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचार पद्धती चांगली असल्याने अल्प काळातच दररोज ४०० च्या वर ओ.पी.डीमध्ये रुग्ण उपचार घेत असतात़ परंतु काही दिवसापासून बारड रुग्णालयात अँटिबायोटिक औषधींचा तुटवडा असल्याने दररोज ४००च्या वर रुग्ण असल्याने तज्ज्ञ डॉक्टरांची टीक असतानाही योग्य औषधीसाठा उपलब्ध नसल्याने रुग्णालयात रुग्णावर केलेला उपचार हा कुचकामी ठरत आहे. बारड परिसरात सध्या पाऊस पडून उघडल्याने अचानक वातावरणात बदल होवून व्हायरल इन्फेक्शन सुरू झाले असून यापासून लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला, तसेच निमोनिया आजार मोठ्या प्रमाणात बळकावत आहे़ तसेच मोठ्या व्यक्तीलाही आजाराचे इन्फेक्शन सुरू आहे़ बारड रूग्णालयात बालरोग तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ अशी डॉक्टरांची टीक कार्यरत आहे़ या ठिकाणी रूग्णांना उपचार पद्धतही चांगली असल्याकारणे मुदखेड, अर्धापूर या तालूक्यातून विष्णुपूरी रुग्णालय लांब पडत असल्याकारणाने इथेही उपचार चांगला मिळतो या विश्वासाने रुग्ण उपचारासाठी बारड ग्रामीण रुग्णालयात दाखल होत आहेत. परंतु काही दिवसापासून रुग्णालयात उपचारासाठी अनेक औषधोपचार उपलब्ध नसल्याने तज्ज्ञ डॉक्टर टीम असून उपचार कुचकामी ठरत आहे. डॉक्टरांना पेशंटचा उपचार करत असताना अडचणी निर्माण होत आहेत.
दोन वषार्पासून शासनाने औषधी खरेदी केली नसल्याची माहिती मिळाली आहे़ परंतु रुग्णालय स्तरावर औषधी तुटवडा भरुन काढण्यासाठी दहा लाखांची तरतुद केली असल्याचे समजते़ यावर ही रुग्णकल्याण निधीतून ही औषधे खरेदी करता येत असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु या ठिकाणी कुठलाच निधी खर्च केला नसल्याची माहिती समोर आली आहे. शासनाने रुग्णसेवेसाठी अनेक तरतुदी केल्या आहेत़ परंतु या ठिकाणी अँटिबायोटिक औषधी साठाच उपलब्ध नसल्याने या परिसरातील गरीब, सामान्य ग्रामीण भागातील रुग्णांना औषधे मिळत नसल्याने रुग्ण आजारापासून रोगमुक्त होत नसल्याची ओरड सुरु आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात ओ.पी.डी. रुग्णांची संख्या रुग्णालयात असल्याने या ठिकाणी लहान मुलांच्या आजारावर तसेच पुरुष रुग्ण, स्त्री रुग्ण उपचारासाठी येतात़ याठिकाणी मुबलक औषधीसाठा असण्याची गरज आहे. प्रत्येक आजारावर एकच उपल्ब्ध असलेले औषध देण्याची वेळ या ठिकाणी आली आहे. त्यामुळे रुग्णांना रिजल्ट मिळत नसल्यामुळे रुग्णाची गैरसोय होत असताना दिसत आहे. होणारे रुग्णांचे हाल थांबविण्यासाठी रुग्णालयात उपचारसाठी

Web Title: Scarcity of medicines in rural hospital in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.