१३१० कुटुंबांच्या मावेजाचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:07 PM2019-03-11T23:07:02+5:302019-03-11T23:08:24+5:30

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे होत असलेल्या लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या १३१० कुटुंबांच्या मावेजाचा प्रश्न मार्गी लागला आहे़ १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पाच लाभधारकांना आॅनलाईन मावेजाचे वाटप करुन पैसे वितरणाची सुरुवात करण्यात आली. मावेजाचा प्रश्न निकाली निघाल्याने आता धरणाच्या कामाला गती मिळणार आहे़

Resolve question of 1310 families | १३१० कुटुंबांच्या मावेजाचा प्रश्न मार्गी

१३१० कुटुंबांच्या मावेजाचा प्रश्न मार्गी

Next
ठळक मुद्देमुखेड तालक्यातील लेंडीप्रकल्प शेतकऱ्यांना दिलासा, ५ जणांना आॅनलाईन मावेजा, मुक्रमाबादेत फटाके

मुखेड/ मुक्रमाबाद : मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे होत असलेल्या लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या १३१० कुटुंबांच्या मावेजाचा प्रश्न मार्गी लागला आहे़ १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पाच लाभधारकांना आॅनलाईन मावेजाचे वाटप करुन पैसे वितरणाची सुरुवात करण्यात आली. मावेजाचा प्रश्न निकाली निघाल्याने आता धरणाच्या कामाला गती मिळणार आहे़
महाराष्ट्र व तेलंगणा राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने इ.स. १९८४ मध्ये लेंडी धरणाची निर्मिती करण्यात आली. या धरणात मुक्रमाबाद येथील १३१० घरे बुडीत क्षेत्रात संपादित करण्यात आली. मागील ३५ वर्षांपासून लेंडी प्रकल्पग्रस्तांना मावेजा मिळाला नसल्याने येथील प्रकल्पग्रस्तांच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली़ याच मागणीसाठी शेतकऱ्यांनी मुक्रमाबाद बाजारपेठही बंद ठेवली होती़ तसेच २०१८ मध्ये या लाभधारकांनी मावेजा मिळावा म्हणून बेमुदत उपोषणही केले होते.
दरम्यान, मागील ३ वर्र्षात या प्रकल्पासाठी शासनाकडून १७६ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत़ १ नोव्हेंबर २०१८ रोजी जलसंपदामंत्री यांनीही मावेजाची रक्कम तातडीने देण्याबाबतचा शब्द विधिमंडळात दिला होता़ त्यानुसार १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे झालेल्या बैठकीनंतर १३१० कुटुंबांना ९३ कोटींच्या मावेजाचे वाटप आॅनलाईन प्रणालीद्वारे करण्यास सुरुवात झाली. मुक्रमाबाद येथील वॉर्ड क्रमांक १ मधील माणिक रानबा कांबळे, विठ्ठल अमृत जाधव, शशीकपूर गंगाधर तेलंग, रुक्मिणबाई नागोराव गायकवाड, सूर्यकांत रामराव मुक्रमाबादकर या ६ लाभधारकांना ७७/१ च्या नोटिसा बजावून आॅनलाईन पद्धतीने मावेजाही देण्यात आला. दरम्यान, या प्रक्रियेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
बाजारपेठही बंद

  • धरणात मुक्रमाबाद येथील १३१० घरे बुडीत क्षेत्रात संपादित करण्यात आली. मागील ३५ वर्षांपासून लेंडी प्रकल्पग्रस्तांना मावेजा मिळाला नसल्याने येथील प्रकल्पग्रस्तांच्या वतीने अनेक आंदोलने करण्यात आली़ याच मागणीसाठी शेतक-यांनी मुक्रमाबाद बाजारपेठही बंद ठेवली होती़
  • १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे झालेल्या बैठकीनंतर १३१० कुटुंबांना ९३ कोटींच्या मावेजाचे वाटप आॅनलाईन प्रणालीद्वारे करण्यास सुरुवात झाली. मुक्रमाबाद येथील वॉर्ड क्रमांक १ मधील माणिक रानबा कांबळे, विठ्ठल अमृत जाधव, शशीकपूर गंगाधर तेलंग, रुक्मिणबाई नागोराव गायकवाड, सूर्यकांत रामराव मुक्रमाबादकर या ६ लाभधारकांना ७७/१ च्या नोटिसा बजावून आॅनलाईन पद्धतीने मावेजाही देण्यात आला.

Web Title: Resolve question of 1310 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.