सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:50 AM2018-10-17T00:50:51+5:302018-10-17T00:51:14+5:30

नांदेड उत्तर मतदारसंघातील समन्वय समितीची बैठक मंगळवारी आ. डी. पी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात पार पडली. या बैठकीत सरपंचासह विविध गावच्या ग्रामस्थांनी अनेक सरकारी योजनांचा निधी गावात पोहचत नसल्याच्या तक्रारी केल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा. आज उपस्थित झालेल्या प्रश्नासंदर्भात पुन्हा आढावा घेणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.

Resolve common questions | सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करा

सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करा

Next
ठळक मुद्देडी. पी. सावंत यांनी दिले प्रशासनाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड उत्तर मतदारसंघातील समन्वय समितीची बैठक मंगळवारी आ. डी. पी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात पार पडली. या बैठकीत सरपंचासह विविध गावच्या ग्रामस्थांनी अनेक सरकारी योजनांचा निधी गावात पोहचत नसल्याच्या तक्रारी केल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा. आज उपस्थित झालेल्या प्रश्नासंदर्भात पुन्हा आढावा घेणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.
समन्वय समितीच्या बैठकीला उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, पं. स. सभापती सुखदेव जाधव, जि.प. सदस्य साहेबराव धनगे, डॉ. दिनेश निखाते, जि. प. सदस्य मनोहर शिंदे, गंगाप्रसाद काकडे यांच्यासह तहसीलदार किरण अंबेकर, नायब तहसीलदार पोटे, बीडीओ सरोदे, तालुका कृषी अधिकारी सरदेशपांडे उपस्थित होते.
या बैठकीत आ. सावंत यांनी सरपंच, उपसरपंचासह ग्रामस्थांकडून गावनिहाय अडचणी जाणून घेतल्या. यावेळी तब्बल ८० टक्के ग्रामस्थांनी पाणीटंचाईच्या अनुषंगाने टँकर देण्याची मागणी केली. याबरोबरच विंधन विहिरीचे अधिग्रहण करण्याबाबतही आग्रह धरला. दरम्यान, मागील वर्षी केलेल्या अधिग्रहणाचे पैसे अद्यापही मिळालेले नाही. याबरोबरच बोंडअळीची नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे सांगितले. कृषी विभागातील कर्मचाºयांच्या रिक्त जागांचा मुद्दाही उपस्थित झाला. यावर आ. सावंत यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यामुळे पुन्हा बैठक घेऊन आढावा घेणार असल्याचे त्यांनी अधिकाºयांना सांगितले.

Web Title: Resolve common questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.