प्राथमिक शिक्षकांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:22 AM2019-02-23T00:22:11+5:302019-02-23T00:22:36+5:30

अखिल महाराष्ट प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.

Primary teachers' demonstrations | प्राथमिक शिक्षकांची निदर्शने

प्राथमिक शिक्षकांची निदर्शने

Next

नांदेड : जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत जिल्हा परिषदेच्या उदासीन कार्यपद्धतीबद्दल असंतोष व्यक्त करीत अखिल महाराष्ट प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.
पदोन्नत मुख्याध्यापकांची पदे भरावीत, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांचीही रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यासाठी आणि विषय शिक्षक पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी तसेच २०१७-१८ चे भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या देण्यात याव्यात. तसेच याकामी दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, चटोपाध्याय वेतनश्रेणीची पुरवणी यादी व निवडश्रेणी यादी जाहीर करावी, तसेच २३ आॅक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार पात्र शिक्षकांना सांगली, सोलापूर जिल्ह्याप्रमणे चटोपाध्याय व निवड श्रेणी देण्यात यावी, गारगव्हाण ता. हदगाव येथील शाळेच्या मुख्याध्यापकाचे निलंबन रद्द करण्यात यावे, वस्तीशाळा निम्न शिक्षकांना १ मार्च २०१४ पासून प्राथमिक शिक्षकांची वेतनश्रेणी देवून त्याकाळातील थकबाकी देण्यात यावी, डीसीपीएस कपातीच्या नोंदी अद्ययावत करण्यात याव्यात, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांच्या पदस्थापना काळातील प्रतीक्षा कालावधी तात्काळ देण्यात यावा, विहित मुदतीत संगणक अर्हता प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होवू न शकलेल्या शिक्षकांची थकबाकी वसुलीस शासन निर्णयानुसार स्थगित करण्यात यावे, या मागण्यासाठी निदर्शने करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष देवीदास बस्वदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य संघटक चंद्रकांत मेकाले, जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, सरचिटणीस प्रल्हाद राठोड, विजय पल्लेवाड, माणिक कदम, गंगाधर मावले, उदय देवकांबळे, संतोष कदम, दत्तात्रय धात्रक, तुका पाटील, गंगाधर नंदेवाड, मिथून मंडलेवार, माधव परगेवार, भगवान जाधव, बी.आर. येडे, व्यंकट भोगाजे, नारायण पेरके, शरद धोबे, एस.आर. स्वामी, माधव कल्हाळे, मंगेश हनवटे, मनोहर शिरसाठ, मंगल सोनकांबळे, शिवहार सोनवळे, आर. बी. जाधव, बी.बी. चव्हाण, व्ही. आर. लामदाडे, के.सी. नरवाडे, रावसाहेब माने, बी.एस. जाधव, सतीश जानकर, एस.एन. नुक्कलवार, के.एम. ताकलोड, एन. डी. सावरगावे, बी.सी. कळवे, बी. बी. यमलवाड, ए.डी. कदम, आर.जी. तळणे, माधव वड, पी.डी. शिंदे, व्ही.के. पंदनवाड, जे.पी. काळे, राजुरे, आर.एस. सावळे, व्ही.व्ही. कल्याणकर, के.पी. पतंगे, आनंदा नरवाडे, सोनटक्के, शिरगीरे, तुप्तेवार आदी सहभागी होते.

Web Title: Primary teachers' demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.