पोलीस उपनिरीक्षक पदासाठी नांदेड जिल्ह्यातील २५ जणांची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 18:35 IST2017-12-28T18:35:33+5:302017-12-28T18:35:39+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील ८२८ उमेदवारांची पोलीस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीसाठी शिफारस केली आहे़ यामध्ये नांदेड जिल्ह्यातील २५ जणांचा समावेश आहे़

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी नांदेड जिल्ह्यातील २५ जणांची शिफारस
नांदेड : पोलीस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१६ चा सुधारित निकाल जाहीर झाला आहे़ त्याआधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील ८२८ उमेदवारांची पोलीस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीसाठी शिफारस केली आहे़ यामध्ये नांदेड जिल्ह्यातील २५ जणांचा समावेश आहे़
यात श्रीमंगल आनंद नामदेवराव, तुकडे नागनाथ हणमंतगोंडा, गावंडे किशोर श्यामराव, चव्हाण मारोती बाबूराव, भोसले संदीप व्यंकटराव, वाघमारे श्रीधर किशनराव, गोटतीर्थवाले जसपालसिंग राजसिंग, कोरके टोपाजी एकनाथराव, गिरी सुनीलगिर शिवगिर, घाडगे राजाभाऊ बाबूराव, लोसरवार बालाजी चंद्रकांत, जुन्ने ज्ञानेश्वर गोविंदराव, गंधकवाड पंढरी लक्ष्मण, बोराटे आतिष सीताराम, तारु रवींद्र मारोती, मेनकुदळे जगन्नाथ वैजनाथ, चव्हाण अविनाश बाबूराव, गाडेकर गजानन विठ्ठलराव, जोनापल्ले बालाजी भगवान, गोणारकर बालाजी राम, लोहेकर अजय यादवराव, जोंधळे बापू मारोती, सोनकांबळे गौतम गंगाधर, गायकवाड मुरारी किशनराव आणि सोनकांबळे अनिल चंपतराव यांचा समावेश आहे़ वरील २५ उमेदवारांचे पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण ८ जानेवारीपासून नाशिक येथील अकादमीमध्ये होणार असून सदर प्रशिक्षणाकरिता संबंधित उमेदवारांना त्यांच्या आस्थापनेवरुन कार्यमुक्त करण्याचे आदेशही पोलीस महासंचालक कार्यालयाने दिले आहेत़
शिफारस झालेल्या उमेदवारांत परभणी जिल्ह्यातील ११ तर हिंगोली जिल्ह्यातील १२ जणांचा समावेश आहे़ परभणीमधून मुंडे भरत लक्ष्मणराव, गडदे संदीप भगवानराव, आगलावे प्रवीण शिवाजीराव, खरडे संतोष त्र्यंबकराव, गवळी युवराज दत्तराव, अबुज विनोद नरहरी, भिसे माधव मदनसाहेब, गायकवाड रमेश साहेबराव, परिहार चंदनसिंह रामसिंह,शिंदे नारायण मारोती आणि बोंडले शिवाजी लक्ष्मण यांचा समावेश आहे़ तर हिंगोलीतून गिते सुरेश पुंडलिकराव, पवार गणेश पंजाबराव, शेळके दीपक अमोल, चिट्टेवार तुळशीराम योगीराज, मरग रंजित फुलसिंग, काळे गजानन दत्ता, तावडे सतीश, नरवाडे शिवराज, फड राहुल, किरवले बालाजी, यलगुलवार राजेश आणि गायकवाड जलबाजी एकनाथ यांचा समावेश आहे़