प्रकाश आंबेडकरांसोबत सकारात्मक चर्चा; त्यांनी राज्यातून लोकसभेवर जावे अशी आमची इच्छा : अशोकराव चव्हाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 07:48 PM2019-01-16T19:48:45+5:302019-01-16T19:49:09+5:30

अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मुंबईत सकारात्मक चर्चा झाली असून राज्यातून ते लोकसभेत जावेत, अशी आमची इच्छा आहे.

Positive discussion with Prakash Ambedkar; We want him to go to the Lok Sabha in the state: Ashokrao Chavan | प्रकाश आंबेडकरांसोबत सकारात्मक चर्चा; त्यांनी राज्यातून लोकसभेवर जावे अशी आमची इच्छा : अशोकराव चव्हाण 

प्रकाश आंबेडकरांसोबत सकारात्मक चर्चा; त्यांनी राज्यातून लोकसभेवर जावे अशी आमची इच्छा : अशोकराव चव्हाण 

Next

नांदेड : काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा सुरु असून आमच्यासोबतच्या मित्रपक्षांनाही जागा सोडण्यात येणार आहेत़ अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मुंबईत सकारात्मक चर्चा झाली असून राज्यातून ते लोकसभेत जावेत, अशी आमची इच्छा आहे,  अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी दिली़ 

खा़चव्हाण पत्रपरिषदेत म्हणाले, अ‍ॅड़प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत मुंबईत माझी भेट झाली होती़ त्यावेळी आमची चर्चा झाली़ त्यामध्ये अनेक विषय होते़ त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? या विषयी व्यक्तिगत चर्चा मी करणार नाही़ त्यांनीही याबाबत ती करु नये असे मला वाटते़ शिवसेना-भाजपाची युती होणारच आहे़ त्यांचे वरुन कीर्तन आतून तमाशा असे सुरु आहे़ सवर्णांच्या दहा टक्के आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा होता़ परंतु, हे सर्व चुनावी जुमले आहेत़ येत्या काळात तर घोषणांचा पाऊसच पडणार आहे़ भाजपाकडून सध्या देशभरात फोडाफोडीचे राजकारण करण्यात येत आहे़ पक्षांतर बंदीचा कायदाच ते हटवू पाहत आहेत़ याला कुठेतरी प्रतिबंध बसण्याची गरज आहे,असेही ते यावेळी म्हणाले. 

Web Title: Positive discussion with Prakash Ambedkar; We want him to go to the Lok Sabha in the state: Ashokrao Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.