नांदेड पालिकेसाठी आज मतदान; उद्या मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:44 AM2017-10-11T04:44:08+5:302017-10-11T04:44:16+5:30

नांदेड महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ वॉर्डांसाठी बुधवारी मतदान होणार आहे. तर गुरुवारी मतमोजणी होईल. बुधवारी सकाळी ७:३० वाजेपासून मतदान सुरू होईल.

 Polling for Nanded Municipal Corporation today; Tomorrow counting | नांदेड पालिकेसाठी आज मतदान; उद्या मतमोजणी

नांदेड पालिकेसाठी आज मतदान; उद्या मतमोजणी

googlenewsNext

नांदेड : नांदेड महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ वॉर्डांसाठी बुधवारी मतदान होणार आहे. तर गुरुवारी मतमोजणी होईल.
बुधवारी सकाळी ७:३० वाजेपासून मतदान सुरू होईल. मतदानासाठी २,५०० इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरल्या जाणार आहेत. १३७ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित केली आहेत. विविध पक्षांचे ४२३ तर १५५ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात पहिल्यांदा वोटर व्हेरीफाईड पेपर आॅडिट ट्रेल अर्थात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार आहे. प्रभाग २मधील ३७ मतदान केंद्रांवर या मशिन्स बसविल्या जाणार असून, मतदारांना व्हीव्हीपॅट मशीनवर मतदान बघायला मिळणार आहे.

Web Title:  Polling for Nanded Municipal Corporation today; Tomorrow counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.