नांदेडमध्ये पेट्रोल ८५़२२ रुपयांच्या उच्चांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:12 AM2018-05-20T01:12:38+5:302018-05-20T01:12:38+5:30

राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल दरवाढीत नांदेड पहिल्या दोन शहरांमध्ये येते़ नांदेड शहरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्यामुळे अगोदरच नांदेडकर हैराण झाले असताना कर्नाटकच्या निवडणुका संपताच इंधनाच्या दरवाढीचा भडका उडाला आहे़ अवघ्या सहा दिवसांत पेट्रोल पावणे दोन रुपयांनी वाढून ८५़२२ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले आहे़ इंधन दरवाढीचा हा भडका आता नांदेडकरांना असह्य होत आहे़

Petrol at Nanded at a height of Rs 8522 | नांदेडमध्ये पेट्रोल ८५़२२ रुपयांच्या उच्चांकावर

नांदेडमध्ये पेट्रोल ८५़२२ रुपयांच्या उच्चांकावर

Next

शिवराज बिचेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल दरवाढीत नांदेड पहिल्या दोन शहरांमध्ये येते़ नांदेड शहरात पेट्रोल आणि डिझेलचे भाव अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्यामुळे अगोदरच नांदेडकर हैराण झाले असताना कर्नाटकच्या निवडणुका संपताच इंधनाच्या दरवाढीचा भडका उडाला आहे़ अवघ्या सहा दिवसांत पेट्रोल पावणे दोन रुपयांनी वाढून ८५़२२ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले आहे़ इंधन दरवाढीचा हा भडका आता नांदेडकरांना असह्य होत आहे़
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरच महागाई अवलंबून आहे़ परंतु, गेल्या सहा महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे़ मागील वर्षी एप्रिल महिन्यात नांदेडात पेट्रोलचे दर ७४़ ४० पैसे तर डिझेलचा दर ६२़५० पैसे होता़ त्यानंतर वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात साधारणत: नऊ रुपये आणि सात रुपये वाढ झाली आहे़ एप्रिलनंतर कर्नाटकाच्या निवडणुकांमुळे काही काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात स्थिर होते़ परंतु, आता कनार्टकच्या निवडणुका संपताच पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे़ १२ मे रोजी नांदेडात पेट्रोलचे दर ८३़८८ पैसे, डिझेल-७०़५२ पैसे, १३ मे रोजी पेट्रोल-८३़८८, डिझेल-७०़५२, १४ मे पेट्रोल-८४़१३, डिझेल-७०़८२, १५ मे पेट्रोल-८४़२८, डिझेल-७१़०४, १६ मे रोजी पेट्रोल-८४़४३ तर डिझेल-७१़२६, १७ मे पेट्रोल-८४़६५, डिझेल-७१़२९, १८ मे पेट्रोल-८४़९३ तर डिझेल-७१़७९ रुपयांवर पोहोचले होते़ तर १९ मे रोजी नांदेडात पेट्रोलचे दर ८५़२२ पैसे तर डिझेल ७२़०३ पैशाच्या उच्चांकावर पोहचले होते़ वर्षभरात दररोज किंवा दिवसाआड काही पैशाने ही दरवाढ करण्यात येत आहे़
दरम्यान, इंधन दरवाढीच्या विरोधात मुंबई येथे मोटर मालक संघटनेची बैठक घेण्यात आली. या बैठकीत दरवाढीबाबत संताप व्यक्त करण्यात आला असून आगामी जूनच्या पहिल्या आठवड्यात देशव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती नांदेड जिल्हा मोटर मालक संघटनेचे सुखविंदरसिंघ हुंदल यांनी दिली़
---
जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढणार
पेट्रोल, डिझेलच्या भडकलेल्या दरामुळे जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे़ नांदेड शहरात येणारा भाजीपाला हा आजूबाजूच्या परिसरातून येतो़ त्यामुळे भाजीपाल्यासह इतर जीवनाश्यक वस्तूही महाग होण्याची चिन्हे आहेत़ अगोदरच महागाईने होरळपलेल्या जनतेला इंधन दरवाढीमुळे मोठा शॉक बसणार आहे़
पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर पाहता जवळ असलेली वाहने विकून टाकण्याशिवाय पर्याय नाही़ प्रदूषणमुक्तीसाठी मोदी सरकार सातत्याने इंधन दरवाढ करीत असेल अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे़ नागरिकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचाच वापर करावा असाही त्यामागे उद्देश असू शकतो़ अशी बोचरी टीका सामाजिक कार्यकर्ते महेंद्र देमगुंडे यांनी केली़ तसेच ज्या ठिकाणी फक्त ट्रकने माल आणावा लागतो़ त्यांच्यासाठी सरकारने काय पर्यायी व्यवस्था केली याचेही उत्तर देण्याची गरज आहे़
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्यामुळे वाहनांचा वापर किती करायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही तेवढी सक्षम नसल्यामुळे नाईलाज आहे़ परंतु, या वाढीमुळे महागाई वाढणार असून बजेटही कोलमडणार आहे़ त्यामुळे दर आवाक्यात असणे गरजेचे आहे असे मत देवानंद कल्याणकर यांनी व्यक्त केले़
---
तीन महिन्यांत पेट्रोल, डिझेलच्या किमतीत अशी वाढ
१ मार्च रोजी नांदेडात पेट्रोलचे दर ८०़८८ पैसे, डिझेल ६६़७० पैसे, ८ मार्च रोजी पेट्रोल वाढून ८१़६८ पैसे तर डिझेल ६७़३९ पैसे, १४ मार्चला पेट्रोल ८१़७६, डिझेल ७६़३३ तर २२ मार्च रोजी पेट्रोल ८१़५५ तर डिझेल ६७़३३ पैसे दराने विक्री करण्यात आले़ त्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढच होत गेली़
१ एप्रिल रोजी पेट्रोल ८३ रुपये, डिझेल ६९़१२, ३ एप्रिल रोजी पेट्रोल ८३़२१, डिझेल ६९़३७ रुपये दराने विक्री करण्यात आले़
एप्रिलमध्ये दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलमध्ये जवळपास एक ते सव्वा रुपयाने वाढ करण्यात आली होती़ त्यानंतर मे महिन्यात पेट्रोलचे दर ८५ रुपयांवर तर डिझेलचे दर ७२ रुपयांवर पोहोचले आहेत़

Web Title: Petrol at Nanded at a height of Rs 8522

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.